पॅट कमिन्सच्या निर्णयावर मोहम्मद कैफचे २ तिखट सवाल; Virat Kohli असता तर...?

सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना पॅट कमिन्सच्या ( Pat Cummins) एका निर्णयाने गाजतोय..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 03:07 PM2024-04-06T15:07:48+5:302024-04-06T15:08:08+5:30

whatsapp join usJoin us
Mohammad Kaif wanted to know if Pat Cummins didn't appeal against Jadeja just to keep MS Dhoni indoors a little longer and would he have done the same against Kohli? | पॅट कमिन्सच्या निर्णयावर मोहम्मद कैफचे २ तिखट सवाल; Virat Kohli असता तर...?

पॅट कमिन्सच्या निर्णयावर मोहम्मद कैफचे २ तिखट सवाल; Virat Kohli असता तर...?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, SRH vs CSK : सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना पॅट कमिन्सच्या ( Pat Cummins) एका निर्णयाने गाजतोय.. CSKच्या डावाच्या १९व्या षटकात रवींद्र जडेजा थ्रो आणि विकेटच्या मध्ये आला. गोलंदाज भुवनेश्वर कुमारने रन आऊटसाठी फेकलेला चेंडू रवींद्र जडेजाच्या पाठीत आदळला. त्यामुळे तो धावबाद होण्यापासून वाचला. मैदानात अडथळा आणण्याच्या नियमानुसार जडेजाला आऊट देता आले असते. मात्र SRHचा कर्णधार पॅट कमिन्सने अपील न करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. पण स्वतःच्या फायद्यासाठी त्याने जडेजाला वाचवले, असाही विचार एका गटाकडून होतोय.  


रवींद्र जडेजा डेथ ओव्हर्समध्ये धावा काढण्यासाठी धडपडत होता. त्याच्याविरुद्ध अपील करण्यात आले तेव्हा जडेजा २० चेंडूत २५ धावांवर खेळत होता. १४व्या षटकात आलेल्या फलंदाजाकडून १९ व्या षटकापर्यंत क्रीजवर असेल तर त्याच्याकडून वेगवान खेळी अपेक्षित असते. पण जडेजाला एक षटकार किंवा चौकारही मारता आला नाही. अशा स्थितीत कमिन्सने अपील मागे घेतल्यानंतर जडेजा क्रीजवरच राहिला. अपील झाले आणि त्याला बाद केले गेले, तर पुढचा फलंदाज महेंद्रसिंग धोनी असता. धोनीने मागील सामन्यात कशी फलंदाजी केली, याची जाण कमिन्सला होती. कदाचित त्यामुळेच कमिन्सने  अपील मागे घेण्याचा निर्णय घेतला असावा.


भारतीय संघाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफनेही पॅट कमिन्सच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तो म्हणाला, जडेजाविरुद्धची अपील मागे घेण्याच्या निर्णयाबाबत मी पॅट कमिन्सला दोन प्रश्न विचारू इच्छितो... महेंद्रसिंग धोनीला फलंदाजीला येऊ न देण्यासाठी अडखळणाऱ्या जडेला मैदानावर ठेवण्यासाठीची ही रणनीती होता का? ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जर विराट कोहलीबाबतही कमिन्सने असेच केले असते का?  

Web Title: Mohammad Kaif wanted to know if Pat Cummins didn't appeal against Jadeja just to keep MS Dhoni indoors a little longer and would he have done the same against Kohli?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.