IPL 2024, PBKS vs MI : मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवला गेल्यापासून हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. आयपीएल २०२४ मधील प्रत्येक सामन्यात चाहते हार्दिक विरोधी नारे देताना दिसत आहेत... रोहित शर्मा व विराट कोहली या भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडूंच्या विनंतीनंतरही प्रेक्षकांनी हार्दिकला ट्रोल केलेले थांबवले नाही. आता मुंबई इंडियन्सचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळतेय... हार्दिकच्या निर्णयावर टीका करणारी पोस्ट MI च्या संघातील एका खेळाडूने त्याच्या इंस्टा स्टोरीवर शेअर केल्याने हा वाद समोर आला आहे.
Fixing? डग आऊटमधून इशारा झाला, अम्पायरने मुंबई इंडियन्सच्या बाजूने निर्णय फिरवला? Video
काल मुंबई इंडियन्सने रोमहर्षक लढतीत ९ धावांनी पंजाब किंग्सवर विजय मिळवला. या सामन्यात अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू मोहम्मद नबी ( Mohammad Nabi ) याला एकही षटक फेकण्यास दिले गेले नाही. त्यावर त्याच्या एका चाहत्याने जोरदार टीका केली आणि नबीने ही पोस्ट शेअर केली. त्याला षटक तर मिळाले नाहीच, शिवाय मुंबईच्या डावातील १ चेंडू शिल्लक असताना तो फलंदाजीला आला. आपल्या आवडत्या खेळाडूला मिळालेली वागणूक पाहून चाहता संतापला आणि त्याने हार्दिक पांड्याच्या निर्णयावर टीका केली.
''आमच्या कर्णधाराचे काही निर्णय आश्चर्यचकीत करणारे होते आणि त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला. नबीला एकही षटक दिले गेले नाही,''असे त्या चाहत्याने लिहिले होते आणि नबीने ही पोस्ट शेअर केली.
सामन्यात नेमकं काय घडलं?
मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव ( ७८), रोहित शर्मा ( ३६) व तिलक वर्मा ( ३४) यांच्या फटकेबाजीच्या दोरावर ७ बाद १९२ धावांचा डोंगर उभा केला. पंजाब किंग्सने १४ धावांत ४ विकेट्स गमावल्या. जसप्रीत बुमराह व गेराल्ड कोएत्झी यांनी सुरुवातीला हे धक्के दिले. त्यानंतर ६ बाद ७७ वरून शशांक सिंग व हरप्रीत भाटीया यांनी पंजाबला सावरण्याचा प्रयत्न केला.
शशांक व आशुतोष शर्मा हे पुन्हा एकदा पंजाबचे संकटमोचक बनले. बुमराहने शशांकला ( ४१) माघारी पाठवले, पण आशुतोष व हरप्रीत ब्रार उभे राहिले. आशुतोषने २८ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ६१ धावा चोपल्या, तर हरप्रीतने २१ धावांचे योगदान दिले. शेवटच्या काही षटकात पंजाबने विकेट्स गमावल्या आणि सामना हातून निसटला. पंजाबचा संपूर्ण संघ १९.१ षटकांत १८३ धावांवर तंबूत परतला.
Web Title: Mohammad Nabi, the Mumbai Indians all-rounder, has openly criticized his skipper Hardik Pandya's captaincy, which indicates a major rift in the MI team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.