नवी दिल्ली : टी-20 विश्वषक 2022 ला सुरूवात झाली आहे. आज सराव सामन्यामध्ये भारत आणि यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघात लढत पार पडली. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात आहे. खरं तर भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला स्थान मिळाले आहे. मोहम्मद शमी मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन करत आहे, अशातच त्याने एक भावनिक पोस्ट करून आपली भावना व्यक्त केली आहे.
दरम्यान, सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ब्रिस्बेन स्टेडियमवर सामना खेळवला गेला. भारतीय संघाने शानदार खेळी करून कांगारूच्या संघावर 6 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 बळी पटकावले. तर भुवनेश्वर कुमार (2), अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या, आणि युजवेंद्र चहल यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 186 धावा केल्या होत्या. ज्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाला 20 षटकांत सर्वबाद 180 धावा करण्यात यश आले. भारताकडून सलामीवीर लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी खेळी केली होती. यांच्याव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा (15), विराट कोहली (19) आणि दिनेश कार्तिक (20) धावा करून बाद झाला.
मोहम्मद शमीची भावनिक पोस्ट सामन्याच्या पूर्वसंध्येला मोहम्मद शमीने एक भावनिक पोस्ट करत म्हटले, "संघात परत येण्यासाठी खूप परिश्रम, वचनबद्धता आणि समर्पण आवश्यक होते परंतु ऑस्ट्रेलियाचा प्रवास पूर्णपणे फायद्याचा ठरला. #TeamIndia आणि माझ्या संघातील खेळाडूंसोबत येण्यापेक्षा चांगली भावना नाही. मी आता विश्वचषकाची वाट पाहत आहे."
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न13 नोव्हेंबरला अंतिम सामना