ठळक मुद्देत्याचे वैयक्तिक आयुष्य आणि करीअर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जे काही घडत आहे, त्याचा परीणाम शामीच्या खेळावर होता कामा नये, असे बीसीसीआयला वाटते.
नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या आयुष्यात गेल्या काही दिवसांपासून वादळं येत होती. पत्नी हसीन जहाँने शामीवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आठवडाभर शामीच्या आयुष्यात काहीच चांगले घडत नव्हते. पण त्याला आनंद देणारी एक गोष्ट घडली आहे आणि ती म्हणजे त्याचा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने आपल्या एका बैठकीमध्ये हा निर्णय घेतला आहे.
हसीनने शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. पण आता तर हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
हसीनने हे सारे आरोप केल्यावर बीसीसीआयने आपल्या करारामधून शामीला वगळले होते. त्याचबरोबर बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधविरोधी पथकाने तब्बल तीन तास शामीची कसून चौकशी केली होती. त्यानंतर शामी आता आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही, असा अफवा पसरत होत्या. पण या साऱ्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण बीसीसीआयने शामीला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे.
बीसीसीआयच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्तपत्राला सांगितले की, " शामी हा एक असाधारण क्रिकेटपटू आहे. त्याचे वैयक्तिक आयुष्य आणि करीअर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जे काही घडत आहे, त्याचा परीणाम शामीच्या खेळावर होता कामा नये, असे आम्हाला वाटते. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये खेळू देण्याचा निर्णयावर आम्ही आलो आहोत."
Web Title: Mohammad Shami will play in IPL BCCI sources said
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.