sourav ganguly news rg kar : कोलकाता येथील घटनेचे देशभरात पडसाद पडत आहेत. विविध राजकीय पक्षांसह विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी संताप व्यक्त करत आहेत. कोलकाता येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेने देशभरात खळबळ माजली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी यावरून रोष व्यक्त करत आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू सौरव गांगुलीने देखील याप्रकरणी बोलताना संताप व्यक्त केला. कोलकाता येथील कनिष्ठ महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हृदयात धडकी भरवणारी ही घटना कानावर पडताच अंगावर काटा येतो. आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात ९ ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली अन् एकच खळबळ माजली. हे प्रकरण ताजे असताना क्रिकेटपटू मोहम्मद शमीची माजी पत्नी हसीन जहाँने सौरव गांगुलीवर टीकास्त्र सोडले.
कोलकाता खून प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. गांगुलीने याप्रकरणी बोलताना, वेगवेगळ्या गोष्टींवरून सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नसल्याचे सांगितले. माजी खेळाडू सौरव गांगुलीच्या विधानाचा दाखला देत हसीन जहाँने संतप्त प्रतिक्रिया दिली. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर गांगुलीचा व्हिडीओ शेअर करत निशाणा साधला.
सौरव गांगुलीसारख्या लोकांसाठी महिला म्हणजे कदाचित केवळ मनोरंजनाचे साधन आहे. तेव्हाच तर तो बोलतो आहे की, अत्याचारासारख्या घटना जगभरात घडत असतात. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करायला नकोत. पश्चिम बंगाल आणि भारत महिलांसाठी सुरक्षित आहे. दरम्यान, सौरवजी तुमची मुलगी सुरक्षित असल्याने तुम्हाला दुसऱ्यांच्या वेदना समजणार नाहीत. तू काय आहेस हे मला २०१८ मध्येच समजले आणि तेव्हाच मी सर्व जाणून घेतले होते. आता बंगालच्या लोकांना सत्य जाणून घेण्याची आवश्यकता आहे. कारण की एक चांगला क्रिकेटर चांगला माणूस असेलच असे काही नाही, अशा शब्दांत हसीन जहाँने गांगुलीवर टीका केली. मात्र, नेटकऱ्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत 'दादा'ची संपूर्ण क्लिप ऐकण्याचा सल्ला दिला.