Join us  

 Hasin Jahan: आपल्या देशाचे नाव हिंदुस्थान किंवा भारतच असायला हवे; शमीच्या पत्नीने मोदींकडे केली मागणी 

क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी नेहमीच काही ना काही कारणांवरून चर्चेत असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 9:33 AM

Open in App

नवी दिल्ली : क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी नेहमीच काही ना काही कारणांवरून चर्चेत असते. मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) वैयक्तिक आयुष्यात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. शमीची पत्नी हसीन जहॉंने (Hasin Jahan) त्याच्यावर खटला देखील दाखल केला आहे. त्यांच्या वैयक्तिक जीवनातील वादाने कोर्टाची पायरी गाठली आहे. सध्या मोहम्मद शमी आपल्या घातक गोलंदाजीने जगभरातील दिग्गज फलंदाजांना चितपट करत आहे. शमीने मोठे धाडस दाखवले आणि सर्व वाद आणि वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार मागे टाकून आपल्या खेळीवर लक्ष केंद्रीत केले. 

दरम्यान, आता पुन्हा एकदा शमीची पत्नी हसीन जहॉं चर्चेचा विषय बनली आहे. कारण तिने पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना एक आवाहन केले आहे. आपल्या देशाचे इंडिया हे नाव बदलण्याची तिने मागणी केली आहे. हसीन जहॉंने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून लिहले, "आपला देश, आपला अभिमान. भारतावर माझे प्रेम आहे. आपल्या देशाचे नाव हिंदुस्थान किंवा भारतच असायला हवे. मानणीय पंतप्रधान जी, मानणीय गृहमंत्री जी यांना मी आवाहन करते की इंडिया हे नाव बदला, ज्यामुळे संपूर्ण जग आपल्या देशाला भारत किंवा हिंदुस्थान या नावाने ओळखेल." 

हे कॅप्शन लिहून जहॉंने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती एका देशभक्तीपर गाण्यावर आपल्या सहकाऱ्यासोबत नृत्य करत आहे. पेशाने मॉडेल असलेली हसीन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती सतत फोटो, व्हिडीओ पोस्ट करून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. शमी आणि त्याची पत्नी जहॉं यांच्यातील वाद अद्याप संपलेला नाही. मात्र शमीने सातत्याने त्या वादाकडे दुर्लक्ष केले असून क्रिकेटवर भर दिला आहे. मात्र आता त्याच्या पत्नीने शमी आणि त्यांच्या मुलीबद्दल एक वक्तव्य केले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद चिघळण्याची चिन्हं आहेत. 

अलीकडेच शमीवर केले होते गंभीर आरोप"आता आमची मुलगी मोठी होत आहे. ती शाळेत जाते, शाळेतील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. तिथे सर्वजण आपापल्या वडीलांसोबत कार्यक्रमांना हजेरी लावत असतात ते पाहून ती देखील शमीच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न करते. मात्र शमी तिच्याशी बोलत नसून तिला कधीच कोणतीच गोष्ट गिफ्ट म्हणून देत नाही. याशिवाय आपल्या मुलीला ईदच्या दिवशीही कपडे पाठवत नाही. गेल्या महिन्यात मुलीने तिच्या वाढदिवशी प्रश्न विचारला असता तिने वडिलांना मेसेज करून गिफ्ट पाठवण्यास सांगितले होते," असे हसीन जहॉंने आरोप करताना म्हटले. 

निकृष्ट दर्जाचे कपडे पाठवलेहसीनने म्हटले की, मुलीच्या सांगण्यावरून शमीने गिफ्ट तर पाठवले मात्र फुटपाथवर ५०, १०० रुपयांना विकले जाणारे ड्रेस पाठवले आणि ते आकाराने देखील लहान होते. ते कपडे पाहून मला असे वाटले की कोट्यवधी रूपये कमावणारा क्रिकेटर स्वत:साठी एका दिवसात लाखो रूपयांची शॉपिंग करतो आणि आपल्या मुलीला एवढ्या निकृष्ट दर्जाचे कपडे कसे पाठवू शकतो. अशा शब्दांत हसीन जहॉंने शमीवर गंभीर आरोप केले आहेत. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघमोहम्मद शामीभारतपंतप्रधाननरेंद्र मोदीअमित शाहगृह मंत्रालय
Open in App