Hasin Jahan: मोहम्मद शमीच्या पत्नीने शेअर केला हार्दिकचा फोटो; कॅप्शनमधील शब्दाने चिघळला वाद

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने आशिया चषकात शानदार सुरूवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 01:00 PM2022-09-02T13:00:59+5:302022-09-02T13:03:09+5:30

whatsapp join usJoin us
Mohammad Shami's wife Hasin Jahan has targeted Shami by posting hardik pandya photo on Instagram | Hasin Jahan: मोहम्मद शमीच्या पत्नीने शेअर केला हार्दिकचा फोटो; कॅप्शनमधील शब्दाने चिघळला वाद

Hasin Jahan: मोहम्मद शमीच्या पत्नीने शेअर केला हार्दिकचा फोटो; कॅप्शनमधील शब्दाने चिघळला वाद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. भारतीय संघाने सलग दोन सामने जिंकून सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. आपल्या सलामीच्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (Pakistan) 5 बळी राखून पराभव केला होता. या सामन्यानंतर भारतीय समर्थकांनी मोठा जल्लोष केला होता. मागील वर्षी टी-20 विश्वचषकात झालेल्या पराभवाचा वचवा काढल्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या चाहत्यांमध्ये मोहम्मद शमीची (Mohammad Shami) पत्नी हसीन जहॉंचा (Hasin Jahan) देखील समावेश होता. मात्र हसीनने केलेल्या एका पोस्टमुळे आता वाद चिघळला आहे.

हसीनने शमीवर साधला निशाणा
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर शमीच्या पत्नीने हार्दिक पांड्याचा एक फोटो शेअर करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. पण या फोटोच्या कॅप्शनमध्ये हसीनने असे काही लिहले आहे की त्यामुळे खळबळ उडाली आहे. हसीनने लिहिले, "अभिनंदन. एक अविस्मरणीय विजय, देशाला विजय मिळवून दिल्याबद्दल आमच्या वाघांचे खूप खूप आभार. हे व्हायला हवे होते, देशाचा दर्जा, देशाची प्रतिष्ठा, प्रामाणिकपणा, देशभक्ती यांपासूनच तर देश वाचतो, गुन्हेगार महिलांपासून नाही." या पोस्टचे कॅप्शन पाहून हसीनने थेट मोहम्मद शमीवर निशाणा साधला असल्याचे पाहायला मिळत आहे. 

हसीन जहाँच्या या पोस्टनंतर मोहम्मद शमीचे चाहते चांगलेच संतापले आहेत. शमीचे चाहते हसीनला कमेंट बॉक्समध्ये कडक शब्दात उत्तर देत आहेत. शमीने नेहमीच देशाचे नाव उंचावले, असे अनेकजण म्हणत आहेत. त्याचबरोबर हसीनबद्दल अनेकजण अश्लील कमेंट देखील करत आहेत. हसीनच्या पोस्ट्समुळे इंन्स्टाग्रामवर अनेकदा वाद चिघळला आहे. मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहॉं यांच्यातील वाद अद्याप संपलेला नाही. मात्र शमीने सातत्याने या वादाकडे दुर्लक्ष केले असून क्रिकेटवर भर दिला आहे. अलीकडेच त्याच्या पत्नीने शमी आणि त्यांच्या मुलीबद्दल एक वक्तव्य केले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा हे दोघे चर्चेत आले होते. 

शमीवर केले होते गंभीर आरोप
काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हसीन जहॉंने शमीवर काही गंभीर आरोप केले होते. "आता आमची मुलगी मोठी होत आहे. ती शाळेत जाते, शाळेतील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. तिथे सर्वजण आपापल्या वडीलांसोबत कार्यक्रमांना हजेरी लावत असतात ते पाहून ती देखील शमीच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न करते. मात्र शमी तिच्याशी बोलत नसून तिला कधीच कोणतीच गोष्ट गिफ्ट म्हणून देत नाही. याशिवाय आपल्या मुलीला ईदच्या दिवशीही कपडे पाठवत नाही. गेल्या महिन्यात मुलीने तिच्या वाढदिवशी प्रश्न विचारला असता तिने वडिलांना मेसेज करून गिफ्ट पाठवण्यास सांगितले होते," असे हसीन जहॉंने आरोप करताना म्हटले. 

निकृष्ट दर्जाचे कपडे पाठवले
हसीनने म्हटले की, मुलीच्या सांगण्यावरून शमीने गिफ्ट तर पाठवले मात्र फुटपाथवर ५०, १०० रुपयांना विकले जाणारे ड्रेस पाठवले आणि ते आकाराने देखील लहान होते. ते कपडे पाहून मला असे वाटले की कोट्यवधी रूपये कमावणारा क्रिकेटर स्वत:साठी एका दिवसात लाखो रूपयांची शॉपिंग करतो आणि आपल्या मुलीला एवढ्या निकृष्ट दर्जाचे कपडे कसे पाठवू शकतो. अशा शब्दांत हसीन जहॉंने शमीवर गंभीर आरोप केले आहेत. 

 

Web Title: Mohammad Shami's wife Hasin Jahan has targeted Shami by posting hardik pandya photo on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.