Join us  

नाद करा, पण...! मोहम्मद सिराजचे जगावर राज्य, शुबमन गिल 'बाबर'ला धक्का देण्यासाठी सज्ज 

ICC ODI Ranking : भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj)  हा वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 1:51 PM

Open in App

ICC ODI Ranking : भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj)  हा वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर आला आहे. आयसीसीने आज वन डे क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली. आशिया चषक २०२३ स्पर्धेतील अंतिम सामन्यात सिराजने श्रीलंकेविरुद्ध ६ विकेट्स घेत अनेक विक्रम मोडले आणि त्याचे फळ त्याला मिळाले. सिराजने सातव्या क्रमांकावरून ६ स्थानांची झेप घेतली आणि ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडला मागे टाकले.  

आशिया चषकाच्या फायनलमध्ये सिराजने २१ धावांत ६ विकेट्स घेताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ ५० धावांत तंबूत पाठवला. त्याने आशिया चषकात १२.२च्या सरासरीने १० विकेट्स घेतल्या. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याने हेझलवूड, ट्रेंट बोल्ट, राशीद खान आणि मिचेल स्टार्क या दिग्गजांना मागे टाकले. अफगाणिस्तानचे फिरकीपटू मुजीब उर रहमान आणि राशीद यांच्याही क्रमवारीत सुधारणा झाली आहे आणि ते अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराजनेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत चांगली कामगिरी केली. तो १० स्थानांच्या सुधारणेसह १५व्या क्रमांकावर आला आहे. भारताचा कुलदीप यादव तीन स्थान खाली घसरला आहे आणि तो ९व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

फलंदाजांमध्ये शुबमन गिल पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमला टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. बाबर ८५७ पॉईंट्सह अव्वल स्थानावर आहे, परंतु गिलने ताज्या क्रमवारीत त्याचे व बाबर यांच्यातील पॉईंट्सचे अंतर ४३ ने कमी केले आहे. गिल ८१४ पॉईंट्सस दुसऱ्या क्रमांकावर आहे.  विराट कोहली एक स्थान वर सरकला आहे आणि ८व्या क्रमांकावर आलाय, तर रोहित शर्मा १०व्या क्रमांकावर कायम आहे.

आयसीसी रँकिंगमध्ये भारताचे वर्चस्वकसोटी- नंबर १ट्वेंटी-२० - नंबर १वन डे - नंबर २ट्वेंटी-२०त नंबर १ फलंदाज - सुर्यकुमार यादववन डे त नंबर १ गोलंदाज - मोहम्मद सिराजकसोटीत नंबर १ गोलंदाज - आर अश्विनकसोटीत नंबर १ अष्टपैलू - रवींद्र जडेजाकसोटीत नंबर २ अष्टपैलू - आर अश्विन कसोटीत नंबर ३ गोलंदाज - रवींद्र जडेजावन डे त नंबर २ फलंदाज - शुबमन गिलट्वेंटी-२०त नंबर २ अष्टपैलू - हार्दिक पांड्या

 

टॅग्स :मोहम्मद सिराजशुभमन गिलआयसीसी