Join us  

Mohammad Siraj in Chahal TV : श्रेयस अय्यरची मुलाखत सुरू असताना मोहम्मद सिराज मध्येच आला, युझवेंद्र चहलने त्याचा पाणउतारा केला, Video 

Mohammad Siraj makes a special appearance in Chahal TV - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि आता श्रीलंका... भारतीय संघाने तीनही ट्वेंटी-२० मालिकांमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 11:12 AM

Open in App

Mohammad Siraj makes a special appearance in Chahal TV - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि आता श्रीलंका... भारतीय संघाने तीनही ट्वेंटी-२० मालिकांमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत विराट कोहली, रिषभ पंत, लोकेश राहुल हे अनुभवी खेळाडू संघात नसूनही रोहित शर्माने ( Rohit Sharma) युवा खेळाडूंना सोबत घेऊन  दमदार कामगिरी केली.  इशान किशन, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, संजू सॅसमन, रवी बिश्नोई, आवेश खान आणि श्रेयस अय्यर ही मजबूत फळी भारताला मिळाली आहे. श्रेयस अय्यरने या मालिकेत सर्वांना अधिक प्रभावित केले आणि भारताकडून सर्वाधिक धावाही त्याने केल्या. त्यामुळेच त्याला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

श्रेयस अय्यरने या मालिकेत १७४.३५ च्या स्ट्राईक रेटने नाबाद २०४ धावा केल्या. श्रीलंकेला तीन सामन्यांच्या मालिकेत श्रेयसला एकदाही बाद करता आले नाही. त्याने या मालिकेत ५७*, ७४* व ७३* अशी खेळी केली. तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत २००+ धावा करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला. त्याने विराटचा ( वि. ऑस्ट्रेलिया, २०१६) १९९ धावांचा विक्रम मोडला.   एका ट्वेंटी-२० मालिकेत सलग तीन ५०+ धावा करणारा तो विराट कोहलीनंतर दुसरा भारतीय ठरला. विराटने २०१२ मध्ये ( वि. श्रीलंका, न्यूझीलंड व अफगाणिस्ता), २०१४ मध्ये ( वि. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड) आणि २०१६ मध्ये ( वि. ऑस्ट्रेलिया) सलग तीन सामन्यांत ५०+ धावांचा पराक्रम केला होता.  

या अविश्वसनीय कामगिरीनंतर युझवेंद्र चहल TVवर श्रेयसची मुलाखत घेण्यात आली. यावेळी श्रेयसने त्याच्या कामगिरीबद्दल त्याचे मत व्यक्त केले. मुलाखत रंगात आली असताना भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज याची एन्ट्री झाली आणि त्यावेळी चहलने त्याची फिरकी घेतली. तो म्हणाला, मोहम्मद सिराजचे केस बघा... असं वाटतंय की बरेच दिवस झाले गवताला पाणी दिलेले नाही... 

पाहा पूर्ण व्हिडीओ...

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाश्रेयस अय्यरमोहम्मद सिराजयुजवेंद्र चहल
Open in App