Join us  

सिराज वन डे मालिकेतून बाहेर; त्याच्या जागी संघात कोणाला संधी? 'हे' आहेत 4 पर्याय

Siraj IND vs WI 1st ODI: सिराजच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाल्याने सिरिजमधून माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 4:36 PM

Open in App

Mohammad Siraj Ruled Out, IND vs WI 1st ODI Updates: वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज मालिकेतून बाहेर झाला. तो मायदेशी परतला आहे. पायाच्या घोट्याच्या दुखण्याच्या तक्रारीनंतर, खबरदारीचा उपाय म्हणून भारताने सिराजला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याच्या जागी कोणत्याही बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता या दौऱ्यातील वन डे मालिकेसाठी सिराजच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू आहे.

टीम इंडियाकडे 4 पर्याय

सिराज हा या दौऱ्यावरील भारताचा सर्वात अनुभवी गोलंदाज होता. त्याच्या अनुपस्थितीत शार्दुल ठाकूर भारतीय संघातील सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. शार्दुलच्या नावावर 35 सामन्यांत 50 बळी आहेत. अन्य तीन वेगवान गोलंदाजांमध्ये उमरान मलिक, जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार यांचा समावेश आहे. यातील उमरान आणि उनाडकट या दोघांनी मिळून १५ वनडे सामने खेळले आहेत. तर मुकेशला अजूनही पदार्पणाची संधी मिळालेली नाही. सध्या संघात अष्टपैलू हार्दिक पांड्या हा वेगवान गोलंदाज आहे. पण आता सिराज नसताना अनुभवाच्या जोरावर शार्दुल ठाकूर आणि उमरान मलिक या वेगवान जोडीला संघात स्थान मिळण्याची शक्यता सर्वाधिक मानली जात आहे.

सिराजबद्दल बीसीसीआयने काय दिली माहिती?

बीसीसीआयने म्हटले आहे की - वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या घोट्याला दुखापत झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्रिनिदाद येथे नुकत्याच पार पडलेल्या कसोटी सामन्यात त्याने 31 षटके टाकली. भारतीय संघाने कसोटी मालिका १-० ने जिंकली. पण सिराजला सध्या विश्रांतीची गरज असल्याने तो मायदेशी परतत आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमोहम्मद सिराजशार्दुल ठाकूरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App