Mohammad Siraj Jos Buttler Video, IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरूद्ध राजस्थान रॉयल्सने २० षटकांत १४४ धावा केल्या. बहुतांश फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर रियान परागने नाबाद अर्धशतक ठोकत संघाला सन्माजनक धावसंख्या उभारून दिली. त्याने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ५६ धावांची खेळी केली. राजस्थानच्या डावात मोहम्मद सिराजने धडाकेबाज फलंदाज जोस बटलरचा घेतलेला कॅच विशेष चर्चेत राहिला.
बंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजने त्यांना यश मिळवून दिले. RR चा सलामीवीर देवदत्त पडिक्कल (७) LBW झाला. त्यानंतर फलंदाजीत बढती मिळालेल्या राजस्थानने तिसऱ्या क्रमांकावर आर अश्विनला (R Ashwin) संधी दिली. त्याला सिराजने १७ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर जॉस बटलरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना जॉश हेझलवूडने RR ला मोठा धक्का दिला. ८ धावांवर त्याचा सिराजने अप्रतिम झेल टिपला. पाहा व्हिडीओ-
त्यानंतर डॅरेल मिचेल १६ धावांवर, संजू सॅमसन २७ धावांवर बाद झाला. या छोटेखानी खेळीनंतर रियान पराग आणि शिमरॉन हेटमायर जोडी कमाल करेल अशी अपेक्षा होती. हेटमायर स्वस्तात बाद झाला. पण रियान परागने दमदार खेळी केली. शेवटच्या षटकापर्यंत तो पाय रोवून मैदानात उभा राहिला आणि त्याने संघाला १४४ धावांपर्यंत पोहोचवले.