Asia Cup 2022 : Rohit Sharma - भारतीय संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करून Super 4 मधील आपले स्थान पक्के केले. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ( Rohit) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ३५००+ धावांचा टप्पा ओलांडला आणि असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला. शिवाय त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२००० धावांचा टप्पाही पार केला. पण, तरीही रोहित शर्माची देहबोली घाबरलेली दिसतेय, तो गोंधळलेला दिसतोय आणि फार काळ कर्णधारपदावर राहणार नाही, असा दावा पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजने ( Mohammad Hafeez) केला आहे.
रोहित शर्मा हा ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा महेंद्रसिंग धोनीनंतर दुसरा यशस्वी भारतीय कर्णधार आहे. त्याने कर्णधार म्हणून ३१ विजय मिळवले आहेत. पण, मोहम्मद हाफिजने त्याच्या सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून रोहितवर टीका केलीय. पाकिस्तानचा माजी कर्णधार हाफिजने ३५ वर्षीय रोहितची देहबोली कमकुवत वाटतेय. तो घाबरलेला व गोंधळलेला दिसतोय. त्याच्यावर कर्णधारपदाचं दडपण जाणवतंय आणि त्याला काही समस्यांना तोंड द्यावं लागतंय, असा दावा केला. हाफिजने पुढे जाऊन असे म्हटले की, रोहित फार काळ कर्णधारपदावर कायम राहणार नाही.
पाहा व्हिडीओ...
तो म्हणाला, ४० धावांनी सामना जिंकल्यानंतर तुम्ही रोहित शर्माचे हावभाव पाहा. मी त्याच्या देहबोलीबद्दल बोलतोय... ती कमकुवत दिसतेय. तो घाबरलेला दिसतोय. हाँगकाँगविरुद्ध त्याच्यावर दडपण जाणवत होतं. आयपीएलमध्येही त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अपयश येतंय.
Web Title: Mohammed Hafeez has questioned Rohit Sharma's body language as captain and claimed that he won't remain as skipper for long, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.