ICC T20 Ranking: पाकिस्तान संघाचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याचा आयसीसीच्या (ICC) टी-२० क्रिकेटच्या टॉप-१० फलंदाजांच्या यादीत समावेश झाला आहे. झिम्बाब्वे विरुद्धची टी-२० मालिका पाकिस्ताननं २-१ ने जिंकली आहे. या मालिकेत मोहम्मद रिझवाननं लक्षवेधी कामगिरी केली. याच पार्श्वभूमीवर मोहम्मद रिझवान यानं क्रमवारीत झेप घेतली आहे. (Mohammed Rizwan in top 10 of ICC Mens T20I Player Rankings)
"पैसा बोलता है"; IPLमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या सहभागावर दिग्गज माजी खेळाडूचं विधान
२८ वर्षीय रिझवान यानं झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात नाबाद ८२ तर तिसऱ्या सामन्यात नाबाद ९१ धावांची तडफदार खेळी साकारली. याच कामगिरीच्या जोरावर रिझवानला आयसीसीच्या क्रमवारीत तब्बल ५ स्थानांची बढत मिळाली आहे. मोहम्मद रिझवान याला आयसीसीच्या टी-२० सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत १० वं स्थान मिळालं आहे. टी-२० सर्वोत्तम फलंदाजांच्या क्रमवारीत समावेश असलेला रिझवान आता दुसरा पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
मोहम्मद रिझवान यानं भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि इंग्लंडचा कर्णधार इऑन मार्गन यांनाही मागे टाकलं आहे.
आयसीसी टी-२० फलंदाजांची टॉप-१० क्रमवारी पुढीलप्रमाणे:
क्र. | खेळाडू | संघ | गुण |
१. | डेव्हिड मलान | इंग्लंड | ८९२ |
२. | अरोन फिंच | ऑस्ट्रेलिया | ८३० |
३. | बाबर आझम | पाकिस्तान | ८२८ |
४. | डेवॉन कॉनवे | न्यूझीलंड | ७७४ |
५. | विराट कोहली | भारत | ७६२ |
६. | रॅसी वॅन दार दुसेन | द.आफ्रिका | ७५६ |
७. | लोकेश राहुल | भारत | ७४३ |
८. | ग्लेन मॅक्सवेल | ऑस्ट्रेलिया | ६९४ |
९. | मार्टिन गप्तिल | न्यूझीलंड | ६८८ |
१०. | मोहम्मद रिझवान | पाकिस्तान | ६४० |