India's Playing XI vs NZ : हार्दिकसह शार्दूल ठाकूरही OUT? न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियात २ बदल दिसणार 

India's Playing XI vs NZ : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन अपराजित संघ रविवारी समोरासमोर असणआर आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 04:33 PM2023-10-21T16:33:05+5:302023-10-21T16:33:54+5:30

whatsapp join usJoin us
Mohammed Shami and Suryakumar Yadav are likely to replace Hardik Pandya and Shardul Thakur in the match against New Zealand tommorow, Here's India's Playing XI | India's Playing XI vs NZ : हार्दिकसह शार्दूल ठाकूरही OUT? न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियात २ बदल दिसणार 

India's Playing XI vs NZ : हार्दिकसह शार्दूल ठाकूरही OUT? न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियात २ बदल दिसणार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India's Playing XI vs NZ : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन अपराजित संघ रविवारी समोरासमोर असणआर आहेत... भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या सामन्यानंतर गुणतालिकेचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. धर्मशाला येथे होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) दुखापत झाली आणि ३ चेंडू टाकून तो मैदानाबाहेर गेला तो गेलाच... बीसीसीआयने दिलेल्या अपडेट्सनुसार हार्दिक न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे भारताला किवींविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये सक्तिचा बदल करावा लागणार आहे. हार्दिकसह अष्टपैलू म्हणून संघात असलेला शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यालाही बाहेर बसवले जाणार असल्याचे वृत्त समोर येतेय...

पुण्यात भारतीय प्रेक्षकांचा उच्छाद! बांगलादेशचा सुपर फॅन 'Tiger Shoaib' सोबत गैरवर्तन अन्... Video


बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक ९व्या षटकात गोलंदाजीला आला अन् तिसऱ्या चेंडूवर फलंदाजाने मारलेला चेंडू अडवताना त्याचा पाय मुरगळला.. त्याच्या घोट्याला दुखापत झाली आणि त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर बीसीसीआयने अपडेट्स दिले की तो बंगळुरू येथील NCA मध्ये उपचारासाठी गेला आहे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. भारतासाठी हा खूप मोठा धक्का आहे, कारण हार्दिक सध्या चांगल्या फॉर्मात होता. हार्दिकच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळावी, अशी दोन नावं चर्चेत आहेत. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आले.  


शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल हे भारताचे आघाडीचे ५ फलंदाज कायम राहतील. त्यामुळे सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल असा खेळाडू संघाला हवा आहे. हार्दिकसह शार्दूलही या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. शार्दूलला वर्ल्ड कप स्पर्धेत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याने केवळ २ विकेट्स घेतल्या आहेत आणि ६ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. त्याच्याजागी मोहम्मद शमी किंवा आऱ अश्विन यांच्या नावाची चर्चा आहे. पण, धर्मशालाची खेळपट्टी जलदगीत गोलंदाजांसाठी पोषक असल्याने शमीला संधी मिळेल.


भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन वि. न्यूझीलंड - शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमहार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज ( Rohit Sharma (C), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, KL Rahul (WK), Suryakumar Yadav, Ravindra Jadeja, Jasprit Bumrah, Kuldeep Yadav, Mohammed Shami, Mohammed Siraj )
 

Web Title: Mohammed Shami and Suryakumar Yadav are likely to replace Hardik Pandya and Shardul Thakur in the match against New Zealand tommorow, Here's India's Playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.