ठळक मुद्देपण काही वर्षांनी ती अचानक माझ्याशी रोज भांडायला लागली. तिला माझ्याकडून नेमके काय हवे होते, हे मला अजूनही समजले नाही, पहिल्या पतीने केला आरोप.
कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या वादग्रस्त प्रकरणाला रविवारी वेगळे वळण मिळाले आहे. आतापर्यंत शामीवर त्याची पत्नी हसीन जहाँने गंभीर आरोप केले होते. पण आता या प्रकरणात हसीनचा पहिला पतीही प्रसारमाध्यमांसमोर आला आणि या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. प्रसारमाध्यमांसमोर त्याने अशा काही गोष्टींचा उलगडा केला आहे की, हसीन व्यक्ती म्हणून कशी आहे, हे साऱ्यांना समजू शकेल.
शामीची पत्नी हसीन त्याच्यावर खळबळजनक आरोप करत होती. तर, शामी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण देत होता. शामी या प्रकरणात आता अडकरणार, त्याचे करीअर संपणार, अशा चर्चांना उत आला होता. पण या प्रकरणात आता हसीनचा पहिला पत्नी एस. के. सैफुद्दीनने उडी घेतली आहे. त्याने केलेल्या व्यक्तव्यांमुळे आता हसीनच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
एका पाकिस्तानी मुलीसोबत शामीचे अफेअर असून विविध मुलींसोबत ओळख वाढणे आणि त्यांच्याशी संबंध स्थापन करणे अशा कृत्यात शामी गुंतला असल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर हसीनने शामीवर आणखी एक आरोप केला होता. एका चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये हसीनने शमीवर तिच्या हत्येचा कट आणि मॅच फिक्सिंगचा सनसनाटी आरोप केला होता. माझा खून करून मृतदेह जंगलामध्ये दफन करून टाक असं शामी त्याच्या भावाला म्हणाला होता असा गंभीर आरोप हसीनने केला होता.
याप्रकरणी सैफुद्दीन म्हणाला की, हसीन दहावीमध्ये शिकत असताना मी तिला प्रपोज केले होते. त्यानंतर काही वर्षे आमचा संसार चांगला चालला होता. पण काही वर्षांनी ती अचानक माझ्याशी रोज भांडायला लागली. तिला माझ्याकडून नेमके काय हवे होते, हे मला अजूनही समजले नाही. पण तिला माझ्यापासून वेगळे व्हायचे होते. आयुष्यामध्ये तिला मोठी झेप घ्यायची होती. त्यामुळे तिने मला सोडले आणि शामीशी लग्न केले.
हसीनला सैफुद्दीनपासून दोन मुली आहेत. त्यामधली मोठी मुलगी ही दहावीत आणि लहान मुलगी सहावीमध्ये शिकत आहे. याबाबत सैफुद्दीन म्हणाला की, माझ्याबरोबर काडीमोड झाल्यावर हसीनने या दोन्ही मुलींचा सांभाळ करण्यात समथर्ता दर्शवली नाही. तिने या दोन्ही मुलींना माझ्याकडेच ठेवण्याचा अट्टाहास धरला होता. मीदेखील तिची ही मागणी मान्य केली. हसीन आताही या दोन्ही मुलींबरोबर आठवड्याला 2-3 वेळी संपर्क साधते.
Web Title: Mohammed Shami case: Hasin also wants to be worn by me; The first husband's accusation
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.