Mohammed Shami Ex Wife Hasin Jahan Share Romantic Song Post Users Comment Goes Viral : भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ ही जोडी मोठ्या वादानंतर वेगळी झाली. पण अनेकदा हसीन जहाँच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे दोघांच्यातील नाते पुन्हा पुन्हा चर्चेचा विषय ठरताना पाहायला मिळते. यात आता हसीन जहाँच्या नव्या पोस्टची भर पडली आहे. हसीन जहाँनं इन्स्टा रीलच्या माध्यमातून रोमँण्टिंक अंदाज दाखवून दिला आहे. पण या पोस्टवर शमीच्या एका चाहत्यांनं तिची चांगलीच फिरकी घेतली आहे.
तिचा लूक अन् अंदाज एकदम जबरदस्त, पण...
क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक नवी पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावरच्या माध्यमातून तिने जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात तिचा लूक अन् अंदाज एकदम जबरदस्त आहे. तिच्या या व्हिडिओवर लाइक्स अन् कमेंटचा पाऊसही पडतोय. पण यातील एक कमेंट अधिक लक्षवेधी ठरतीये. तिने आपल्या व्हिडिओसाठी जे गाणं निवडलं आहे त्यावरुन एका नेटकऱ्याने मोहम्मद शमीच्या नावाचा उल्लेख करत तिला टोला मारल्याचे दिसून येते.
हसीन जहाँ "दिल जंगली कबूतर" म्हणत झाली रोमँण्टिक अन् या कमेंट्सह आली ट्रोल होण्याची वेळ
शमीवर केला होता दिखावा करत असल्याचा आरोप
मोहम्मद शमी याने काही दिवसांपूर्वी बऱ्याच दिवसांनी आपल्या लेकीला भेटल्यानंतरचा एक खास व्हिडिओ शेअर केला होता. जो चांगलाच व्हायरल झाला. यावर हसीन जहाँनं तो दिखावा करत असल्याचा आरोप केला होता. त्यावेळीही तिला शमीच्या चाहत्यांकडून ट्रोलचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा ती ट्रोल झाल्याचे पाहायला मिळाले.