IPL 2024 , RCB Virat Kohli : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल २०२४ मध्ये आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्सने जयपूर येथे झालेला सामना ६ विकेट्सने जिंकला. विराट कोहलीने या सामन्यात शतक झळकावले होते, परंतु त्याला जॉस बटलरने नाबाद शतकी खेळीने उत्तर दिले. त्याला संजू सॅमसन याची दमदार साथ लाभली.
विराट शेवटच्या चेंडूपर्यंत उभा राहिला, परंतु RCB ला ३ बाद १८३ धावाच करता आल्या. विराट व फॅफ ड्यू प्लेसि यांनी १२५ धावांची सलामी दिली. विराटने ६७ चेंडूंत शतक झळकावले आणि हे आयपीएलमधील संथ शतक ठरले. विराट ७२ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ११३ धावा केल्या. प्रत्युत्तरात संजू सॅमसन व जॉस बटलर यांनी १४८ धावांची ( ८६ चेंडू) भागीदारी केली. संजू ४२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६९ धावांवर बाद झाला. बटलर ५८ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह १०० धावांवर नाबाद राहिला. राजस्थानने ६ विकेटने हा सामना जिंकला. बटलरने RR ला विजयासाठी १ धाव हवी असताना षटकार खेचून शतक पूर्ण केले.
RCB च्या पराभवानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी संतापला. RR Vs RCB सामन्यानंतर Cricbuzz शी बोलताना शमी म्हणाला," विराट कोहलीने नेहमीच कामगिरी केली आहे, मग तो भारतीय संघासाठी असो किंवा आरसीबीसाठी. पण, आरसीबी संपूर्ण भार कोहलीच्या खांद्यावर कसा टाकू शकतो? बाकीच्या फलंदाजांनी जबाबदारी घेण्याची गरज आहे,"असे शमी म्हणाला.
Web Title: Mohammed Shami expresses thoughts on Virat Kohli's knock against Rajasthan Royals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.