भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील घटस्फोटाचे प्रकरण आता संपल्यात जमा आहे. घरगुती हिंसा आणि मॅच फिक्सिंगचा आरोप करणाऱ्या हसीन जहाँने कोर्टात पोटगीसाठी अर्ज केला होता. त्यावर कोर्टाचा निर्णय आला आहे.
हसीन जहाँने शमीवर १० लाखांची पोटगी देण्यासाठी खटला दाखल केला होता. परंतू कोर्टाने १.३० लाख रुपयेच मंजूर केले आहेत. अलीपूर न्यायालयाच्या न्यायाधीश अनिंदिता गांगुली यांनी सोमवारी निर्णय देताना सांगितले की, शमी दर महिन्याला हसीन जहाँला 1 लाख 30 हजार रुपये पोटगी देईल. यामध्ये मुलीसाठी 80 हजार रुपये, तर हसीन जहाँला 50 हजार रुपये दिले जाणार आहेत.
2018 मध्ये, हसीन जहाँने पुन्हा तिच्या प्रोफेशनमद्ये पाऊल ठेवले. ती एक मॉडेल आहे. हसीन जहाँने 10 लाखांच्या पोटगीसाठी कोर्टात केस दाखल केली होती. यामध्ये 7 लाख रुपये तिच्यासाठी वैयक्तिक पोटगी आणि 3 लाख रुपये त्यांच्या मुलीच्या देखभालीसाठी खर्च मागितला होता. 2022 पर्यंत शमीचे वार्षिक उत्पन्न 7 कोटी रुपये होते. अशा परिस्थितीत दरमहा 10 लाख रुपयांची पोटगी अजिबात जास्त नाही, असा दावा हसीनच्या वकिलांनी केला होता.
यावर शमीचे वकील सेलीम रहमान यांनी युक्तीवाद करताना हसीन ही स्वत: कमवत आहे. तिचे उत्पन्न ५० लाख रुपये आहे. ती स्वतः एक प्रोफेशनल फॅशन मॉडेल आहे. अशा परिस्थितीत एवढी पोटगी होत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने दरमहा १.३० लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय घेतला. आता हसीन जहाँ उच्च न्यायालयात अपील करू शकते.