Hasin Jahan On Mohammed Shami: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याची पत्नी हसीन जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मोहम्मद शमी मुलीसोबत गैरवर्तन करत असल्याचा गंभीर आरोप हसीन जहाँने केला आहे. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यातील वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. यावेळी त्याने आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद शमीबद्दल हे वक्तव्य केले.
हसीन जहाँचे गंभीर आरोप
मोहम्मद शमीसोबतच्या वादामुळे हसीन जहाँ मुलीसोबत वेगळी राहते. हसीन जहाँ ही व्यवसायाने अभिनेत्री असून, ती सध्या तिच्या बंगाली भाषेतील चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना तिने शमीवर आरोप केले. ती म्हणाली क, शमीला आपल्या मुलीला भेटण्यात काहीच रस नाही. इतकंच नाही तर तिने शमीवर मुलीसोबत वाईट वर्तन केल्याचा आरोपही केला आहे.
मुलीला 100 रुपयांचा ड्रेस दिला
हसीन जहाँने मुलाखतीदरम्यान सांगितले की, 'मी शमीशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, मुलगी खूप मोठी होत आहे. प्रत्येक ठिकाणी तिला इतरांचे वडील सोबत दिसतात. इतकी वर्षे झाली, शमीने मुलीला एक गिफ्टही पाठवलेले नाही. आता मुलगी मोठी होत असून, तिने याबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. मागच्या वाढदिवसाला मुलीने शमीविषयी विचारणा केली, म्हणून मी शमीला तिच्याशी बोलायला आणि गिफ्ट पाठवायला सांगितले. तर, शमीने रस्त्यावर मिळणारा 100 रुपयांचा ड्रेस गिफ्ट म्हणून पाठवला. मला आश्चर्य वाटले की करोडो कमवणाऱ्याने आपल्या मुलीसाठी इतके घाणेरडे कपडे पाठवले,' अशी प्रतिक्रिया हसीन जहाँने दिली.
शमीवर बलात्काराचा आरोप
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचा विवाह 7 एप्रिल 2014 रोजी झाला. 17 जुलै 2015 रोजी शमी एका मुलीचा बाप झाला. काही वर्षानंतर पत्नीने शमीवर बलात्कारासारखे गंभीर आरोप केले. 2018 साली मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने प्राणघातक हल्ला, बलात्कार, हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. या दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू होता, मात्र अद्याप घटस्फोट झालेला नाही.
Web Title: Mohammed Shami: 'He used to treat our daughter very badly' Hasin Jahan's serious allegations against Mohammed Shami
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.