T20 World Cup 2022 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे आणि दोन सराव सामनेही खेळले. पण, रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह हे दोन धक्के पचवून भारतीय संघाला या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळ करावा लागणार आहे. जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट जाहीर झाली नसताना दीपक चहर ( Deepak Chahar)ने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली. पण, आता बीसीसीआयने जसप्रीत बुमराहच्या जागी मुख्य संघात कोण खेळेल हे जाहीर केले. अपेक्षेप्रमाणे मोहम्मद शमीने ( Mohammad Shami) मुख्य संघात स्थान पटकावले. मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर हे राखीव गोलंदाज म्हणून आज ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी शमीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यालाही माघार घ्यावी लागली. मागील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नंतर शमी मर्यादित षटकांचे सामने खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या फिटनेसची चाचणी करण्यात आली आणि आज NCA तून त्याचा रिपोर्ट आला आणि तो तंदुरुस्त असल्याचे जाहीर केले. शमी ८ नोव्हेंबर २०२१ मध्ये अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता. शमी ब्रिस्बेनला पोहोचला आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी ( India squad for ICC T20 World Cup: Rohit Sharma (Captain), KL Rahul (vice-captain), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, Rishabh Pant (wicket-keeper), Dinesh Karthik (wicket-keeper), Hardik Pandya, R. Ashwin, Yuzvendra Chahal, Axar Patel, Bhuvneshwar Kumar, Harshal Patel, Arshdeep Singh, Mohammed Shami.)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Mohammed Shami named Jasprit Bumrah’s replacement in India’s ICC Men’s T20 World Cup squad. Mohammed Siraj and Shardul Thakur have been named as backups and will travel to Australia shortly
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.