Join us  

Arjuna Award - महाराष्ट्राच्या ओजस, अदितीसह मोहम्मद शमी अन् २४ खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने सन्मान 

National Sports Awards - नवी दिल्लीत आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 11:49 AM

Open in App

National Sports Awards (Marathi News) :  नवी दिल्लीत आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami) याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. शमीसह एकूण २६ खेळाडूंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी व सात्विक साईराज रँकीरेड्डी यांना यंदाचा प्रतिष्ठीत खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. यासह नागपूरचा ओजस प्रवीण देवतळे व साताराची अदिती गोपीचंद स्वामी या तिरंदाजांचाही अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला.  

ओजस व अदिती यांनी मागील वर्षभरात भारताला तिरंदाजीत अनेक ऐतिहासिक पदकं जिंकून दिली आहेत.  विश्वविजेते अदिती आणि ओजस हे सातारा येथील प्रवीण सावंत यांच्या दृष्टी आर्चरी अकादमीत सराव करतात.  

खेलरत्न पुरस्कार चिराग शेट्टी - बॅडमिंटन सात्विक साईराज रँकीरेड्डी - बॅडमिंटन 

अर्जुन पुरस्कारओजस प्रवीण देवतळे - धनुर्विद्याअदिती गोपीचंद स्वामी - धनुर्विद्याश्रीशंकर - ऍथलेटिक्सपारुल चौधरी - ऍथलेटिक्समोहम्मद हुसामुद्दीन - बॉक्सरआर वैशाली - बुद्धिबळमोहम्मद शमी - क्रिकेटअनुष अग्रवाल - घोडेस्वारीदिव्यकृती सिंग - अश्वारूढ पोशाखदीक्षा डागर - गोल्फकृष्ण बहादूर पाठक - हॉकीसुशीला चानू - हॉकीपवन कुमार - कबड्डीरितू नेगी - कबड्डीनसरीन - खो-खोपिंकी - लॉन बॉल्सऐश्वर्या प्रताप सिंह तोमर - शूटिंगईशा सिंग - शूटिंगहरिंदर पाल सिंग - स्क्वॉशअहिका मुखर्जी - टेबल टेनिससुनील कुमार - कुस्तीअंतिम - कुस्तीरोशिबिना देवी - वुशूशीतल देवी - पॅरा धनुर्विद्याअजय कुमार - अंध क्रिकेटप्राची यादव – पॅरा कॅनोइंग

टॅग्स :मोहम्मद शामीमहाराष्ट्र