“तो आधी नीट समजावून सांगतो, तसं झालं नाही, तर मग...”; शामीने सांगितलं रोहित कसा वागतो

Mohammed Shami reveals Big Secret About Rohit Sharma: मोहम्मद शमीने सांगितलेल्या गोष्टींना श्रेयस अय्यरनेही दुजोरा दिला आणि रोहित शर्माच्या मैदानांवरील गमती-जमती सांगितल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 10:11 AM2024-08-22T10:11:24+5:302024-08-22T10:11:54+5:30

whatsapp join usJoin us
mohammed shami reveals big secret about rohit sharma and told his behaviour in the match during a award function | “तो आधी नीट समजावून सांगतो, तसं झालं नाही, तर मग...”; शामीने सांगितलं रोहित कसा वागतो

“तो आधी नीट समजावून सांगतो, तसं झालं नाही, तर मग...”; शामीने सांगितलं रोहित कसा वागतो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mohammed Shami reveals Big Secret About Rohit Sharma:रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले अन् एक इतिहास घडला. रोहित शर्माच्या कॅप्टन्सीबाबत अनेकांनी तोंडभरून कौतुक केले आहे. क्रिकेटप्रेमी तसेच दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्माच्या नेतृत्वगुणांबाबत गौरवोद्गार काढतात. भारतीय संघातील जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने रोहित शर्माच्या स्वभावाबाबत आणि कॅप्टन्सीबाबत बोलताना एक मोठी गोष्ट उघड केली. 

कर्णधार रोहित शर्मा संघातील खेळाडूंना स्वातंत्र्य देतो तसेच सांघिक जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे, यामध्ये चांगले संतुलन साधून खेळ करतो. संघातील खेळाडूंना दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली गेली नाही, तर तो भर मैदानात खेळाडूंना विशेष शब्दिक कोट्या करत सुनावतो, असा अनेकांचा अनुभव आहे. रोहित शर्माची स्क्रीनवर दिसणारी मजा-मस्ती, स्टम्प माइकवर ऐकू येणारा मोकळा संवाद आणि खेळाडूंशी असलेले उत्तम ट्युनिंग याचे अनेक किस्से ऐकले, पाहिलेले आहेत. क्रिकेटप्रेमींनी अनेक गोष्टींच्या केलेल्या रिल्स तुफान व्हायरलही होत असतात. एका पुरस्कार सोहळ्यात बोलताना स्टार पेसर मोहम्मद शमीने मैदानात घडत असलेल्या गमती-जमतींबाबत सांगितले. यावेळी रोहित शर्माच्या टीव्हीवर दिसणाऱ्या विशेष टिपण्णीबाबतही भाष्य केले.

तो आधी नीट समजावून सांगतो, तसं झालं नाही, तर मग...
 
मोहम्मद शमी म्हणाला की, रोहित शर्माची एक गोष्टी अधिक आवडते, ती म्हणजे तो खेळाडूंना स्वातंत्र्य देतो. तुम्हाला दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही, तर रोहित शर्माच्या एक एक अ‍ॅक्शन्स बाहेर यायला सुरुवात होते. खेळाडूने अमूक एक गोष्ट करायला हवी होती किंवा काही परिवर्तन करणे अपेक्षित होते, असे शांतपणे समजावून सांगतो. तरीही ती गोष्ट तशी झाली नाही, तर मग स्क्रीनवर ज्या काही रिअ‍ॅक्शन्स दिसू लागतात, तेव्हा न बोलताही सर्वांना सर्वकाही समजून जाते, अशी मिश्किल टिपण्णी शमीने केली. याचे श्रेयस अय्यरने समर्थन केले. शमीने अगदी बरोबर सांगितले. रोहित जे बोलतो, जसे की, ‘वो’, ‘तो’, ‘उसको’, ‘इसको’ हे शब्द आमच्यासाठी ‘फिलिंग द ब्लँक्स’ असतात. यानंतर आम्ही रोहित नेमका कुणाबद्दल बोलत आहे, याचे चित्र डोळ्यासमोर आणतो. रोहितच्या भावना आम्ही चांगल्या पद्धतीने जाणतो. कारण आम्ही त्याच्यासोबत अनेक वर्ष खेळत आहोत, अशी पुष्टी श्रेयस अय्यरने जोडली.

दरम्यान, मी खेळाडूंना जे काही मैदानात करायला सांगतो, परंतु, ती गोष्ट मी स्वतःहून आधी केली पाहिजे, ते महत्त्वाचे आहे आणि मी तसाच वागण्याचा प्रयत्न करतो, असे रोहित शर्माने यावर बोलताना सांगितले.
 

Web Title: mohammed shami reveals big secret about rohit sharma and told his behaviour in the match during a award function

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.