लंडनच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय मोहम्मद शमी; भावनिक पोस्ट; म्हणाला, स्वतःच्या पायावर... 

मोहम्मद शमी ( Mohammed Shami) आणखी काही काळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:55 AM2024-02-27T10:55:15+5:302024-02-27T10:55:38+5:30

whatsapp join usJoin us
Mohammed Shami underwent surgery for Achilles tendon in London on Monday, set to miss IPL 2024 | लंडनच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय मोहम्मद शमी; भावनिक पोस्ट; म्हणाला, स्वतःच्या पायावर... 

लंडनच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय मोहम्मद शमी; भावनिक पोस्ट; म्हणाला, स्वतःच्या पायावर... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अविश्वसनीय कामगिरीचा नायक मोहम्मद शमी ( Mohammed Shami) आणखी काही काळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे. कदाचित तो इंडियन प्रीमिअर लीग २०२४ लाही मुकण्याची शक्यता आहे. शमी संपूर्ण वर्ल्ड कप दुखापतग्रस्त असूनही इंजेक्शन घेऊन खेळला होता आणि त्याने ७ सामन्यांत २४ विकेट्स घेत प्रतिस्पर्धींना धक्क्यांमागून धक्के दिले होते. तो स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता, परंतु वर्ल्ड कपनंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. सोमवारी त्याच्या टाचांवर लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.  


शमीने इंस्टाग्रामवर लिहिले की, "माझ्या achilles tendon टाचवर नुकतेच यशस्वी ऑपरेशन झाले आहे! ते बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी माझ्या पायावर उभा राहण्यासाठी उत्सुक आहे."


वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मैदानावरील ट्वेंटी-२० मालिकेत खेळू शकला नाही आणि संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौऱ्यातूनही त्याला माघार घ्यावी लागली. तो अफगाणिस्तान मालिकेलाही मुकला आणि इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेचा तो भाग नाही. शमी आयपीएल २०२४ लाही मुकण्याची शक्यता आहे आणि हा गुजरात टायटन्ससाठी मोठा धक्का असेल. गुजरात टायटन्सने मागील दोन मोसमात यश मिळवले आहे आणइ  त्यामागे शमीच्या गोलंदाजीची भूमिका खूप महत्त्वाची आहे.


IPL 2022 मेगा-लिलावात ६.२५  कोटी रुपयांमध्ये गुजरात टायटन्समध्ये सामील झालेल्या शमीने २०२२ मध्ये २० विकेट घेतल्या. त्याने आयपीएल २०२३ मध्ये १७ सामन्यांमध्ये २८ विकेट्स घेतल्या होत्या.  आयपीएल २०२४ मिनी-लिलावात गुजरातने उमेश यादवला आपल्या ताफ्यात घेतले होते आणि शमीच्या अनुपस्थितीत त्याच्यावर जबाबदारी असणार आहे. 

Web Title: Mohammed Shami underwent surgery for Achilles tendon in London on Monday, set to miss IPL 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.