भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्ड कप 2023 मध्ये इतिहास रचण्यापासून केवळ तीन पाऊल दूर आहे. तो एका अशा महाविक्रमाच्या जवळ जाऊन पोहोचला आहे, जो 48 वर्षांच्या वर्ल्ड कप इतिहासात कुणाही भारतीय गोलंदाजाला साध्य झाला नाही. उद्या बेंगळुरू येथे होणार्या नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात, तो हा विक्रम करून इतिहास रचू शकतो. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील आयसीसी विश्वचषक 2023 चा शेवटचा साखळी सामना उद्या अर्थात 12 नोव्हेंबरला दिवाळीच्याच दिवशी बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे.
वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचण्यापासून केवळ तीन पाऊल दूर आहे मोहम्मद शमी -उद्या होणाऱ्या नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात, मोहम्मद शमीने 3 विकेट्स मिळवल्या, तर तो वर्ल्ड कपच्या 48 वर्षांच्या इतिहास 50 विकेट्स पटकावणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरेल. अद्याप भारताच्या कुठल्याही गोलंदाजाला वर्ल्ड कपच्या इतिहासात अशी कामगिरी करता आलेली नाही. मोहम्मद शमीच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये सध्या 47 विकेट्स आहेत. नेदरलँडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात तीन बळी मिळवताच मोहम्मद शमी इतिहास रचेल.
ODI वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारे गेंदबाज - 1. ग्लेन मॅक्ग्रा (ऑस्ट्रेलिया) - 71 2. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - 683. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) - 594. लसिथ मलिंगा (श्रीलंका) - 56 5. वसीम अकरम (पाकिस्तान) - 556. ट्रेंट बोल्ट (न्यूझीलँड) - 52 7. चामिंडा वास (श्रीलंका) - 498. मोहम्मद शमी (भारत) - 47