नवी दिल्ली - भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर पत्नी हसीनने पुन्हा आरोप केले आहेत. या दोघांमधीत वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यावेळी हसीनाने शमीवर वय चोरीचा आरोप केला आहे.
हसीनने तिच्या फेसबुकवर शमीचे पाच वेगवेगळी कागदपत्र पोस्ट केली आहेत. त्यात 10वी, 12वीची मार्कशीट, वाहन परवाना, चेकबुक आणि मतदान ओळखपत्र यांचा समावेश आहे. या कागदपत्राच्या माध्यमातून शमीची वय चोरी जगासमोर आणण्याचा प्रयत्न हसीनाने केला आहे.