ठळक मुद्देशामीला जर बीसीसीआयने क्लीन चीट दिली तर त्याला आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळता येईल. त्याचबरोबर बीसीसीआय आपल्या करारामध्ये शामीला सामील करून घेऊ शकते
मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर त्याची पत्नी हसीन जहाँने गंभीर आरोप केले होते. या आरोपांची दखल बीसीसीआयनेही घेतली होती. बीसीसीआयने शामीला आपल्या करारातूनही वगळले होते. पण आता भ्रष्टाचार विरोधी पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल समोर आल्यावर बीसीसीआय शामीला क्लीन चीट देणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता शामीचे चांगले दिवस सुरु झाले आहेत, असे म्हटले जात आहे.
हसीनने शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. पण आता तर हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर कोलकाता पोलिसांनी शामीची चौकशी केली होती. बीसीसीआयने शामीला आपल्या कारारातून वगळले होते. त्यानंतर बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने शामीची चौकशी केली होती.
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने शामीची तीन तास कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी आपला अहवाल बीसीसीआयला सादर केला होता. या अहवालावर बीसीसीआय शुक्रवारी आपला निर्णय जाहीर करणार आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, " भ्रष्टाचार विरोधी पथकाने आपला अहवाल बीसीसीआयसा सादर केला आहे. या अहवालामध्ये भ्रष्टाचार विरोधी पथकाने शामीवरील आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बीसीसीआय त्याला क्लीन चीट देणार असल्याचे समजत आहे."
शामीला जर बीसीसीआयने क्लीन चीट दिली तर त्याला आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळता येईल. त्याचबरोबर बीसीसीआय आपल्या करारामध्ये शामीला सामील करून घेऊ शकते.
Web Title: Mohammed Shami will gets clean chit from BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.