Join us  

मोहम्मद शामीची तीन तास कसून चौकशी

बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विरोधी पथकाने शामीची तब्बल तीन तास कसून चौकशी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 2:07 PM

Open in App
ठळक मुद्देबीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विरोधी पथकाने शामीची दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत चौकशी केली.

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंगाज मोहम्मद शामीपुढील समस्या थांबत नसल्याचेच पुढे आले आहे. बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विरोधी पथकाने शामीची तब्बल तीन तास कसून चौकशी केली आहे. आता त्याला पोलिसांच्या चौकशीलाही सामोरे जावे लागणार आहे.

गेल्या आठवड्यात हसीनने फेसबुकच्या माध्यमातून शमीवर दगा दिल्याचा आरोप करताना कौटुंबिक कलहाची बळी ठरल्याचे म्हटले होते. दरम्यान, शमीने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावताना हा मला बदनाम करण्याचा व कारकीर्द संपविण्याचा कट असल्याचे म्हटले होते.

शमीने इंग्लंडचा व्यापारी मोहम्मद भाईने सांगितल्यानुसार पाकिस्तानी महिला अलिश्बाकडून पैसे घेतले होते, असे म्हणत हसीनने शामीने देशाची फसवणूक केली आहे असा आरोप केला होता. पण हे आरोप बिनबुडाचे आहेत, असे शामीने म्हटले होते. 

बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विरोधी पथकाने शामीची दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत चौकशी केली. या दौऱ्यानंतर शामी दुबईला गेला होता. या साऱ्या गोष्टींबाबतही शामीची चौकशी करण्यात आली. यावेळी शामीने बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विरोधी पथकाला पूर्णपणे  सहकार्य केले आहे. एका आठवड्यामध्ये या चौकशीचा अहवाल बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

टॅग्स :मोहम्मद शामीबीसीसीआय