Mohammed Siraj-Devon Conway : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बंगळुरु कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज आणि डेवॉन कॉन्वे यांच्यात स्लेजिंगचा खेळ पाहायला मिळाला. न्यूझीलंडच्या डावातील १५ व्या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिले दोन चेंडू निर्धाव टाकल्यावर कॉन्वेला त्याने खुन्नस दिली. या दोघांच्यातील सीननंतर मॅच पाहण्यासाठी स्टेडियमवर जमलेल्या गर्दीतील एक गट सिराजच्या बाजूनं झुकला तर एका गटाने न्यूझीलंडच्या स्टारची बाजू घेतल्याचे पाहायला मिळाले. भारतीय चाहत्यांनी न्यूझीलंडच्या स्टारला सपोर्ट देण्यामागे धोनी अँण्ड CSK फॅक्टर कारणीभूत होता. जाणून घेऊयात यासंदर्भातील चर्चेत असणारी खास स्टोरी
सिराजच्या गोलंदाजीवेळी घुमला "DSP DSP..." असा आवाज
मोहम्मद सिराज हा आपल्या आक्रमक अंदाजाने अनेकदा चाहत्यांचे लक्षवेधून घेताना पाहायला मिळते. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात त्याचा हा तोरा पाहून बंगळुरुच्या स्टेडियमवरील चाहत्यांनी "DSP, DSP, DSP" अस म्हणतं सिराजला पाठिंबा दर्शवल्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेट मोहम्मद सिराजनं न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधीच पोलीस उपअधीक्षक (DSP) पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळेच बंगळुरुच्या स्टेडियमवर उपस्थितीत RCB चाहत्यांनी भारतीय गोलंदाजाला सपोर्ट करताना "DSP DSP" अशी घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.
मग न्यूझीलंड स्टारसाठी CSK चाहत्यांनी घेतला पुढाकार
दुसरीकडे पुढच्या चेंडूवर त्यात आणखी एक नवे ट्विस्ट निर्माण झाले. सिराजच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर डेवॉन कॉन्वेनं एक खणखणीत चौकार मारत स्लेजिंगला बॅटनं उत्तर दिले. त्याच्या या अंदाजानंतर बंगळुरुच्या स्टेडियमवर CSK, CSK, CSK.... असा आवाज घुमला. भारत-न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट मॅचमध्ये RCB vs CSK असा IPL ट्विस्टवाले फिल निर्माण झाले. ही गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
चाहत्यांमुळं टेस्टमध्ये निर्माण झालं IPL मधील ट्विस्टआयपीएल स्पर्धेतील सामन्यावेळी RCB vs CSK चाहते यांच्यातील खडाजंगी पाहायला मिळत असते. बंगळुरुच्या स्टेडियमवर रंगलेल्या भारत न्यूझीलंड यांच्यातील आंतरराष्ट्रीय सामन्यातही IPL फ्रँचायझी संघाच्या चाहत्यांमध्ये सामना रंगल्याचा सीन पाहायला मिळाला. या गोष्टीमुळे बंगळुरुच्या मैदानातील टेस्टमध्ये आयपीएल ट्विस्टसह एक वेगळा माहोल निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. न्यूझीलंडच्या ताफ्यातील सलामीवीर फलंदाज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. दुसरीकडे मोहम्मद सिराज हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना दिसले आहे.