ठळक मुद्देमोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यानंतर मोहम्मद सिराजला पदार्पणाची मिळाली संधीमोहम्मद सिराजनं ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक १३ विकेट्स घेतल्या
मोहम्द सिराज ( Mohammed Siraj) हा भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गवसलेला भविष्याचा स्टार गोलंदाज आहे. इशान शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर गेले असतानाही सिराजनं दोन कसोटींच्या अनुभवावर गॅबा कसोटीत भारतीय गोलंदाजांचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळले. गॅबा कसोटीत पाच विकेट्स घेऊन सिराजनं अनेक दिग्गजांचे विक्रम मोडले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत त्यानं भारताकडून सर्वाधिक १३ विकेट्स घेतल्या. ऐतिहासिक कामगिरीनंतर मायदेशी परतलेल्या सिराजनं स्वतःच एक जबरदस्त गिफ्ट दिलं आणि सोशल मीडियावर आता त्याचीच चर्चा रंगली आहे.
०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियानं सिराज, शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दूल ठाकूर आदी युवा खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पुन्हा स्वतःकडे ठेवली. दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढती संख्या, ऑसी फॅन्सकडून वर्णद्वेषी शेरेबाजी या सर्वांवर मात करून अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं २-१ असा मालिका विजय मिळवला. या सर्व खेळाडूंचे मायदेशात जंगी स्वागत केले गेले. एअरपोर्टवरून थेट वडिलांच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला मोहम्मद सिराज!
मायदेशात परतताच सिराज दफनभूमीत त्याच्या वडिलांच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी गेला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दाखल झाल्यानंतर सिराजच्या वडिलांचे मायदेशात निधन झाले. कोरोना नियमांमुळे त्याला त्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाता आले नाही. तो संघासोबत ऑस्ट्रेलियात थांबला आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. कसोटी मालिकेत पदार्पण करताना त्यानं अनेक दिग्गजांच्या पंक्तित स्थान पटकावले. २६ वर्षीय सिराज हैदराबादला परतला आणि त्यानं शुक्रवारी स्वतःसाठी एक भारी गिफ्ट खरेदी केलं. त्यानं नवी कोरी BMW गाडी खरेदी केली आणि हैदराबादच्या रस्त्यांवर ड्राईव्हही केलं. ( Mohammed Siraj bought himself an expensive BMW after his India return)
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही सिराजचे तौंडभरून कौतुक केले. ते म्हणाले होते की,''या दौऱ्यावर आम्हाला
मोहम्मद सिराज नावाचा वेगानं मारा करणारा गोलंदाज सापडला. वडिलांचे निधन, ऑसी फॅन्सकडून वर्णद्वेषी शेरेबाजीचे रुपांतर त्यानं ताकदीत केलं आणि मैदानावरील कामगिरीनं सर्वांची वाहवाह मिळवली.''
Web Title: Mohammed Siraj gifts himself a BMW after memorable tour of Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.