Mohsin Khan story, IPL 2023 GT vs LSG: गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना एकतर्फी झाला. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यातील द्वंद्व पाहण्याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पहिल्यांदाच दोन सख्खे भाऊ कर्णधार म्हणून एकमेकांच्या विरोधात होते. त्यामुळे त्यामुळे कोण कोणावर मात करतो याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यात हार्दिकने कृणालच्या संघाला पराभवाची चव चाखायला लावली. या सामन्यात लखनौचा संघ पराभूत झाला असला तरी त्यांच्या एका खेळाडूला नक्कीच सलाम केला पाहिजे. आपले वडील हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले असताना, हा खेळाडू मैदानात उतरला आणि त्याने आपले कर्तव्य बजावले. हा खेळाडू म्हणजे लखनौचा २० लाखांच्या बोलीवर संघात आलेला मोहसीन खान.
मोहसीन खान हा एक वेगवान गोलंदाज आहे. वडील हॉस्पिटलमध्ये अँडमिट असतानाही मोहसीन खानने संघासाठी आपलं कर्तव्य बजावलं. इतकंच नव्हे तर सामन्याच्या एका खास क्षणाचा तो भागही झाला. हा सामना पंड्या बंधूंसाठी खूप महत्त्वाचा होता आणि या महत्त्वाच्या सामन्यात हार्दिकला केवळ 25 धावा करता आल्या. मोहसीनने हार्दिकची शिकार केली. त्याने गुजरातच्या कर्णधाराला त्याचा मोठा भाऊ कृणालकरवी झेलबाद होण्यास भाग पाडले. या विकेटसह मोहसीनने यंदाच्या हंगामातली पहिली विकेटही घेतली.
मोहसीन आणि कुटुंबासाठी कठीण काळ
मोहसीन सध्या कठीण काळातून जात आहे. त्याचे वडील आजारी आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. अलीकडेच मोहसीनने वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यावेळी त्याने सांगितले की, माझे वडील खूप खंबीर व्यक्ती आहेत आणि ते लवकरच बरे होतील असा मला विश्वास आहे. मोहसीन वडीलांच्या प्रकृतीच्या काळजीतच नव्हता तर त्याला बऱ्याच वेळ संधीही मिळाली नसल्याने तो दु:खी होता. पण अखेर आज त्याला संधी मिळाली.
वर्षभरानंतर पहिली विकेट
९ सामन्यांत बेंचवर बसल्यानंतर मोहसिनला गेल्या सामन्यातच संधी मिळाली होती, मात्र पावसामुळे सामना रद्द झाला होता. यानंतर त्याला गुजरातविरुद्ध संधी मिळाली आणि त्याने वर्षभरानंतर पहिली विकेट घेतली. मोहसिन शेवटचा आयपीएलमध्येच मैदानावर दिसला होता. त्यानंतर तो डोमेस्टिक क्रिकेटदेखील खेळला नव्हता.