Join us  

IND vs PAK: शाहीन बाहेर होताच 'ओ भाई मारो मुझे' फेम मोमीन पाकिस्तानकडून खेळण्यासाठी सज्ज, पाहा व्हिडिओ

आशिय़ा चषक 2022 चा थरार 27 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 8:01 PM

Open in App

नवी दिल्ली : लवकरच आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) च्या स्पर्धेस सुरूवात होणार असून पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान (SL vs AFG) यांच्यामध्ये पार पडणार आहे. तर स्पर्धेचे प्रबळ दावेदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) रविवारी 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने असणार आहेत. या बहुचर्चित स्पर्धेसाठी एकूण 6 संघ रिंगणात असतील, जे सर्व संघ यूएईत दाखल झाले आहेत. खरं तर यंदा आशिया चषकाचा थरार श्रीलंकेत रंगणार होता. दरम्यान, आशिया चषकाच्या आधीच पाकिस्तानच्या संघाला शाहिन आफ्रिदीच्या रूपात मोठा झटका बसला.

शाहिन बाहेर होताच विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानच्या जबरा फॅनने अशीच एक भन्नाट प्रतिक्रिया देऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. 2019 च्या विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यावेळी पाकिस्तानातील मोमीन साकिब (Momin saqib) हा तरुण आपल्या बोलण्याच्या अनोख्या शैलीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला होता. पाकिस्तानचा पराभव होताच मोमीनची प्रतिक्रिया खूप व्हायरल झाली होती. विश्वचषकाच्या कालावधीतील मोमीनचा 'ओ भाई मारो मुझे..' हा डायलॉग आजही प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे आशिया चषकाच्या तोंडावर पुन्हा एकदा मोमीन चर्चेत आला आहे. 

संघाला गरज असल्यास मैदानात उतरणार खरं तर काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला. याबाबत मोमीनचा व्हिडिओ समोर आला आहे. मोमीनचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मोमीन सराव करत असून यादरम्यान त्याला तू काय करतोस, असा प्रश्न विचारण्यात आला असता मोमीन म्हणाला, मी सराव करत आहे. शाहिन आफ्रिदी खेळत नसेल तर कोणीतरी याचा विचार करायला हवा. जर संघाला माझी गरज असेल तर मी स्वतः मैदानात उतरून तीन शतके ठोकेन. असा दावा देखील मोमीनने केला आहे. 

 

टॅग्स :एशिया कप 2022ऑफ द फिल्डभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App