इथे टीम इंडियाची धुलाई होत असताना दुसरीकडे बांगलादेशच्या फलंदाजानं केला वर्ल्ड रेकॉर्ड!

इंग्लंडचे फलंदाज चेन्नई कसोटीत भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना तेथे चत्तोग्राम येथील कसोटीत बांगलादेशच्या मोमिनूल हकनं ( Mominul Haque) वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.

By स्वदेश घाणेकर | Published: February 6, 2021 01:05 PM2021-02-06T13:05:31+5:302021-02-06T13:05:55+5:30

whatsapp join usJoin us
Mominul Haque becomes the first cricketer to score each of his first ten Test hundreds at home   | इथे टीम इंडियाची धुलाई होत असताना दुसरीकडे बांगलादेशच्या फलंदाजानं केला वर्ल्ड रेकॉर्ड!

इथे टीम इंडियाची धुलाई होत असताना दुसरीकडे बांगलादेशच्या फलंदाजानं केला वर्ल्ड रेकॉर्ड!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंडचे फलंदाज चेन्नई कसोटीत भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना तेथे चत्तोग्राम येथील कसोटीत बांगलादेशच्या मोमिनूल हकनं ( Mominul Haque) वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. बांगलादेशच्या पहिल्या डावातील ४३० धावांच्या उत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २५९ धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात बांगलादेशनं ६५ षटकांत ६ बाद २१७ धावा करून ३८८ धावांची आघाडी घेतली आहे. मोमिनूलनं दुसऱ्या डावात शतक झळकावून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.

सामन्यातील हायलाईट्स 
- मेहदी हसन मिराज ( १०३), शदमन इस्लाम ( ५९), शकिब अल हसन ( ६८) यांच्या दमदार खेळाच्या जोरावर बांगलादेशनं पहिल्या डावात ४३० धावा केल्या. विंडीजच्या जोमेल वॉरिकननं चार विकेट्स घेतल्या.

- कर्णधार क्रेग ब्रेथवेट ( ७६) आणि जेर्मेन ब्लॅकवूड ( ६८) यांच्या अर्धशतकाशिवाय कायले मेयर्स ( ४०) व जोशुआ डा सिल्वा ( ४२) यांनी संघर्ष केला, परंतु त्यांना २५९ धावांवर समाधान मानावे लागले. मेहदी सहननं चार विकेट्स घेतल्या. IPL 2021 Auction : मिचेल स्टार, जो रूट OUT; एस श्रीसंत, अर्जुन तेंडुलकर IN, जाणून घेऊया सर्वांची बेस प्राईज

- दुसऱ्या डावात कर्णधार मोमिनूल हकनं ११५ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे १०वे शतक ठरले. बांगलादेशकडून सर्वाधिक कसोटी शतकाचा विक्रम त्यानं नावावर केला. तमिन इक्बालचा ९ शतकांचा विक्रम त्यानं मोडला. टीम इंडियाचं चाललंय तरी काय?; १५ मिनिटांत दोन झेल सुटले, दोन DRS गमावले अन् सोपा Run Out सोडला!

- मोमिनूलने ही सर्व शतकं घरच्या मैदानावर झळकावली आहे. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी इंग्लंडच्या अॅलेन लॅम्ब यांनी घरच्या मैदानावर ९ शतकांचा विक्रम केला होता. १९८९/९०मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टन येथे १०वे शतक झळकावले.

- कर्णधार म्हणून मोमिनूलचे हे दुसरे कसोटी शतक आहे. यासह त्यानं महमदुल्लाह व मोहम्मद अश्रफुल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. मुश्फीकर रहीमच्या नावावार ४ शतकं आहेत अर्जुन तेंडुलकरनं कोणत्या नियमानुसार नोंदवलं IPL 2021 Auctionसाठी नाव?; जाणून घ्या उत्तर

 

Web Title: Mominul Haque becomes the first cricketer to score each of his first ten Test hundreds at home  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.