Join us  

इथे टीम इंडियाची धुलाई होत असताना दुसरीकडे बांगलादेशच्या फलंदाजानं केला वर्ल्ड रेकॉर्ड!

इंग्लंडचे फलंदाज चेन्नई कसोटीत भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना तेथे चत्तोग्राम येथील कसोटीत बांगलादेशच्या मोमिनूल हकनं ( Mominul Haque) वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.

By स्वदेश घाणेकर | Published: February 06, 2021 1:05 PM

Open in App

इंग्लंडचे फलंदाज चेन्नई कसोटीत भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना तेथे चत्तोग्राम येथील कसोटीत बांगलादेशच्या मोमिनूल हकनं ( Mominul Haque) वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. बांगलादेशच्या पहिल्या डावातील ४३० धावांच्या उत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २५९ धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात बांगलादेशनं ६५ षटकांत ६ बाद २१७ धावा करून ३८८ धावांची आघाडी घेतली आहे. मोमिनूलनं दुसऱ्या डावात शतक झळकावून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.

सामन्यातील हायलाईट्स - मेहदी हसन मिराज ( १०३), शदमन इस्लाम ( ५९), शकिब अल हसन ( ६८) यांच्या दमदार खेळाच्या जोरावर बांगलादेशनं पहिल्या डावात ४३० धावा केल्या. विंडीजच्या जोमेल वॉरिकननं चार विकेट्स घेतल्या.

- कर्णधार क्रेग ब्रेथवेट ( ७६) आणि जेर्मेन ब्लॅकवूड ( ६८) यांच्या अर्धशतकाशिवाय कायले मेयर्स ( ४०) व जोशुआ डा सिल्वा ( ४२) यांनी संघर्ष केला, परंतु त्यांना २५९ धावांवर समाधान मानावे लागले. मेहदी सहननं चार विकेट्स घेतल्या. IPL 2021 Auction : मिचेल स्टार, जो रूट OUT; एस श्रीसंत, अर्जुन तेंडुलकर IN, जाणून घेऊया सर्वांची बेस प्राईज

- दुसऱ्या डावात कर्णधार मोमिनूल हकनं ११५ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे १०वे शतक ठरले. बांगलादेशकडून सर्वाधिक कसोटी शतकाचा विक्रम त्यानं नावावर केला. तमिन इक्बालचा ९ शतकांचा विक्रम त्यानं मोडला. टीम इंडियाचं चाललंय तरी काय?; १५ मिनिटांत दोन झेल सुटले, दोन DRS गमावले अन् सोपा Run Out सोडला!

- मोमिनूलने ही सर्व शतकं घरच्या मैदानावर झळकावली आहे. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी इंग्लंडच्या अॅलेन लॅम्ब यांनी घरच्या मैदानावर ९ शतकांचा विक्रम केला होता. १९८९/९०मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टन येथे १०वे शतक झळकावले.

- कर्णधार म्हणून मोमिनूलचे हे दुसरे कसोटी शतक आहे. यासह त्यानं महमदुल्लाह व मोहम्मद अश्रफुल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. मुश्फीकर रहीमच्या नावावार ४ शतकं आहेत अर्जुन तेंडुलकरनं कोणत्या नियमानुसार नोंदवलं IPL 2021 Auctionसाठी नाव?; जाणून घ्या उत्तर

 

टॅग्स :बांगलादेशवेस्ट इंडिज