अशीच चलाखी होत राहिल्यास अनेकांच्या भुवया उंचावणारच!दुबई : आयपीएलमध्ये खेळत असलेले इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर व टॉम कुरेन मुद्दाम आपल्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार इयोन मॉर्गनविरुद्ध आखूड टप्प्याचा मारा करीत नाहीत, असा आरोप भारताचे दिग्गज खेळाडू व समालोचक सुनील गावसकर यांनी केला आहे. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान समालोचन करताना त्यांनी तसे वक्तव्य केले.
बुधवारी खेळल्या गेलेल्या लढतीत केकेआर संघाच्या विजयात इयोन मॉर्गनने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने केलेल्या ३४ धावांच्या आक्रमक खेळीमुळे कोलकाता संघाला १७४ धावांची मजल मारता आली.
राजस्थान संघ लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला.कोलकाता संघाच्या डावातील १८ व्या षटकात टॉम कुरेनने फुलटॉस चेंडू टाकला. त्यावर इंग्लंडच्या कर्णधाराने चौकार ठोकला. हा चेंडू बघितल्यानंतर गावसकर म्हणाले, ‘हे चांगले आहे. टॉम कुरेनने आपल्या कर्णधाराला सोपा फुलटॉस दिला आणि कर्णधाराने चेंडू सीमापार पोहचविला.’ त्यानंतर गावसकर म्हणाले, ‘गेल्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरने मॉर्गनला एकही बाऊंसर टाकला नव्हता. तुमचा सर्वांत वेगवान गोलंदाज बाऊंसर टाकेल, अशी आशा असते, पण आर्चरने असे केले नाही.’सर्वाधिक डॉट बॉलटाकणारे गोलंदाजशेल्डन कॉटरेल चार सामन्यांत ४७ डॉट बॉल टाकले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट बुमराहपेक्षा चांगला आहे.जसप्रीत बुमराह चार सामन्यात ४७ डॉट बॉल टाकले. त्याने ८.४३ च्या सरासरीने धावा दिल्या.मोहम्मद शमी चार सामन्यांत ४२ डॉट बॉल टाकले. त्याने ७.८६ च्या सरासरीने धावा दिल्या.