Most Beautiful Indian Women Cricketers : या अभिनेत्री नाहीत, तर आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडू!

भारतीय क्रिकेटमध्ये फक्त कौतुक होतं ते विराट कोहली अँड टीमचं... त्यांच्यासारखं ग्लॅमरस जगणं सर्वांना हवंहवंस वाटतं. पण, ग्लॅमरच्या बाबतीत भारतीय महिला संघाच्या खेळाडूही कुठे कमी नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 11:12 AM2021-05-19T11:12:18+5:302021-05-19T11:13:03+5:30

whatsapp join usJoin us
Most Beautiful Indian Women Cricketers: From Smriti Mandhana To Priya Punia, See pic | Most Beautiful Indian Women Cricketers : या अभिनेत्री नाहीत, तर आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडू!

Most Beautiful Indian Women Cricketers : या अभिनेत्री नाहीत, तर आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडू!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय पुरुष संघासोबत महिला संघही पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी बीसीसीआयनं नुकताच संघ जाहीर केला. इंग्लंड दौऱ्यावर महिला संघ एक कसोटी, तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या संघातील काही ग्लॅमरस चेहऱ्यांबाबत जाणून घेऊया...

स्मृती मानधना ( Smriti  Mandhana) - महाराष्ट्राची कन्या स्मृतीनं अल्पावधीतच संघातील स्थान मजबूत केलं. आक्रमक फलंदाजीनं तिनं भल्याभल्या स्टार गोलंदाजांची धुलाई केलीय. ५६ वन डे व ७८ ट्वेंटी-२० सामन्यांत तिनं अनुक्रमे २१७२ व १७८२ धावा केल्या आहेत. वन डेत तिच्या नावावर ४ शतकं व १८ अर्धशतकं आहेत.

मिताली राज ( Mithali Raj) - भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी नाव म्हणजे मिताली राज... २१४ वन डेत ७०९८ धावा आणि ८९ ट्वेंटी-२०त २३६४ धावा तिच्या नावावर आहेत. १० कसोटीत तिनं ६६३ धावा केल्या आहेत. कसोटीत तिच्या नावावर द्विशतकही आहे. 

हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur) - भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मर्यादित षटकांच्या संघाची कर्णधार असलेली हरमनप्रीत आक्रमक खेळीने ओळखली जाते. तिनं १०४ वन डे व ११४ ट्वेंटी-२० सामन्यांत संघाचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे २५३२ व २१८६ धावा कुटल्या आहेत. वन डे क्रिकेटमधील तिची नाबाद १७१ धावांची खेळी आजही सर्वांना मंत्रमुग्ध करते.

तानिया भाटीया ( Taniya Bhatia) - यष्टिरक्षक-फलंदाज तानियानं १५ वन डे व ५० ट्वेंटी-२० सामन्यांत अनुक्रमे १२१ व १६६ धावा केल्या आहेत.

प्रिया पुनिया ( Priya Punia) - इंग्लंड दौऱ्यासाठी मनावर दगड ठेऊन ही खेळाडू भारतीय संघासोबत रवाना होणार आहे. १८ मे रोजी तिच्या आईचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ७ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांचा अनुभव पाठिशी असलेल्या प्रियानं भारतीय महिला संघात स्थान पटकावण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. 

 

Web Title: Most Beautiful Indian Women Cricketers: From Smriti Mandhana To Priya Punia, See pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.