Most Centuries in IPL: आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक शतके ठोकणारे क्रिकेटपटू!

Most Centuries in IPL: सर्वाधिक शतके मारणारे खेळाडू कोण आहेत, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:42 IST2025-04-23T13:42:14+5:302025-04-23T13:42:39+5:30

whatsapp join usJoin us
Most Centuries in IPL Players With the Highest Number of Centuries Virat Kohli to Shubman Gill | Most Centuries in IPL: आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक शतके ठोकणारे क्रिकेटपटू!

Most Centuries in IPL: आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक शतके ठोकणारे क्रिकेटपटू!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Most Centuries in IPL: आयपीएल ही भारतातील एक मनोरंजक स्पर्धा आहे. केवळ भारतीय खेळाडूच नव्हे तर जागतिक किर्तीचे खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी संधी मिळण्याची वाट पाहत असतात. IPL हे एक टी२० क्रिकेटसाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. या स्पर्धेत फलंदाजांकडून अनेक धमाकेदार खेळी पाहायला मिळतात. अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत अविस्मरणीय शतकेही ठोकली आहेत. IPL 2025 पर्यंतच्या हंगामात एकूण ५३ खेळाडूंनी मिळून १०१ शतकांचा आकडा गाठला आहे. यातूनच या स्पर्धेतील आव्हानांचा अंदाज घेता येऊ शकतो. या स्पर्धेत सर्वाधिक शतके मारणारे खेळाडू कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी लॉग ऑन करा Zuplay.com

विराट कोहली: शतकांचा उस्ताद (८ शतके)

विराट कोहली या यादीत अव्वल आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत IPLच्या इतिहासात सर्वात जास्त ८ शतके ठोकली आहेत. फलंदाजीतील सातत्य आणि डाव सांभाळण्याची त्याची कला RCB साठी खूप जास्त महत्त्वाची आहे. कोहलीने २०१६च्या हंगामात ऐतिहासिक कामगिरी करून तब्बल ९७३ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने एकाच हंगामात चार शतके ठोकली होती, जो विक्रम अद्याप कुणीही फलंदाज मोडू शकलेला नाही.

जोस बटलर: स्फोटक सलामीवीर (७ शतके)

इंग्लंडचा जॉस बटलर हा IPL मधील एक अतिशय स्फोटक आणि झंझावाती फलंदाजी म्हणून ओळखला जातो. त्याने या स्पर्धेत एकूण सात शतके झळकावली आहेत. मुंबई इंडियन्स ते राजस्थान रॉयल्स या IPL प्रवासात त्याच्या स्फोटक खेळाची कायमच चर्चा रंगली. प्रत्येक संघाला चांगली सलामी देण्याची भूमिका त्याने चोख पार पाडली. २०२२ हा हंगाम त्याच्यासाठी खास ठरला. त्यात त्याने कोहलीप्रमाणेच एका हंगामात चार शतके ठोकली.

ख्रिस गेल: महान धडाकेबाज फलंदाज (६ शतके)

ख्रिस गेल हा युनिव्हर्स बॉस या नावाने ओळखला जातो. त्याने आपल्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर IPL इतिहासात तब्बल सहा शतके केली आहेत. पुणे वॉरियर्स इंडिया विरूद्ध २०१३च्या हंगामात त्याने ठोकलेल्या नाबाद १७५ धावांची खेळी अविस्मरणीय होती. समोर कुठलाही गोलंदाज असो, ख्रिस गेलने तुफानी फलंदाजी करत मोठी खेळी करून दाखवली होती.

शुबमन गिल: उदयोन्मुख तारा (४ शतके)

शुबमन गिल हा युवा फलंदाज असून तो अतिशय झपाट्याने विविध विक्रम करतो आहे. त्याने आपल्या IPL कारकिर्दीत अतिशय कमी कालावधीत तब्बल ४ शतके ठोकली आहेत. कोलकाता नाइट रायडर्स ते गुजरात टायटन्स हा त्याचा प्रवास त्याच्या कामगिरीला कलाटणी देणारा ठरला. २०२३ साली शुबमनने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप जिंकली होती. त्या हंगामात त्याने तीन शतके ठोकत ८९० धावाही कुटल्या होत्या.

केएल राहुल: सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू (४ शतके)

केएल राहुलने IPL इतिहासात आतापर्यंत विविध संघांचे प्रतिनिधित्व करत दमदार कामगिरी केली आहे आणि एकूण चार शतके ठोकली आहेत. कुठल्याही परिस्थितीला आपलेसे करणे आणि फलंदाजीतील सातत्य या दोन गोष्टींमुळे तो बॅटिंग लाइनअप मध्ये कुठेही फिट होतो. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच बरेच संघाला मोठी धावसंख्या उभारता येते.

शेन वॉटसन: उत्तम अष्टपैलू (४ शतके)

शेन वॉटसन हा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कायमच चर्चेत होता. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही प्रकारच्या क्षेत्रात त्याची कामगिरी उल्लेखनीय होती. त्याने स्पर्धेत एकूण ४ शतके ठोकली. त्यात नाबाद ११७ धावांची खेळी सर्वोत्तम ठरली. शेन वॉटसनने ३,८७४ धावा करत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्ससारख्या संघाच्या दमदार कामगिरीत मोलाचा वाटा उचलला.

डेव्हिड वॉर्नर: आक्रमक सलामीवीर (४ शतके)

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर हा वरच्या फळीतील एक अतिशय आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या नावे या स्पर्धेत चार शतके आहेत. ६५०० पेक्षा जास्त धावा करणारा डेव्हिड वॉर्नर हा आक्रमक फलंदाज असूनही त्याच्या कामगिरीत सातत्य होते, त्यामुळे संघात त्याची जागा जवळपास निश्चित होती.

संजू सॅमसन: निर्भिड स्ट्रायकर (३ शतके)

संजू सॅमसनने आतापर्यंत आपल्या निर्भिड फलंदाजीच्या जोरावर एकूण तीन शतके ठोकली आहेत. आपल्या दमदार आणि निर्भिड फटकेबाजीच्या जोरावर संजूने अनेकदा आपल्या संघाला सामना जिंकवून दिला आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार बनल्यापासून त्याची आक्रमक फलंदाजी आणि नेतृत्वकौशल्य या दोन गोष्टी विशेषत: अधोरेखित झाल्या आहेत.

एबी डीव्हिलियर्स: ३६० डिग्री फलंदाज (३ शतके)

एबी डीव्हिलियर्स हा त्याच्या आधुनिक पद्धतीच्या फटकेबाजीसाठी ओळखा जातो. याच पद्धतीच्या खेळीमुळे त्याने हंगामात एकूण ३ शतके ठोकली आहेत. डीव्हिलियर्स हा मैदानातील सर्व कानाकोपऱ्यात फटकेबाजी करण्याची क्षमता राखतो. RCB कडून खेळताना त्याने काही अशक्य वाटणाऱ्या खेळी करून साऱ्यांनाच अवाक केले होते.

हाशिम अमला: तंत्रशुद्ध फलंदाज (२ शतके)

हाशिम अमला याने IPL मध्ये आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर दोन शतके ठोकली आहेत. टी२० क्रिकेटमध्ये फटकेबाजी खेळ असूनही अमलाने आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने टी२० चे मैदान गाजवले. पंजाब संघाकडून खेळताना त्याने नाबाद १०४ धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. अमलाने आपल्या खेळाडू तंत्रासोबतच आक्रमकपणाचीही चांगली सांगड घातली होती.

IPL हे एक असे व्यासपीठ आहेत, जेथे दरवर्षी कक्षा रूंदावत जातात. प्रत्येक हंगामात स्पर्धेला नवे शतकवीर मिळतात. वर उल्लेख केलेल्या नावांपैकी सर्वांनीच आतापर्यंत IPL मध्ये शतके ठोकून चाहत्यांचे मनोरंजन केले आहेत. त्यांच्यामुळे या स्पर्धेचा दर्जा उंचावला आहे आणि त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

आयपीएलचा अनुभव समृद्ध करू पाहणाऱ्या चाहत्यांसाठी, Zuplay सारखे प्लॅटफॉर्म खेळाशी संवाद साधण्यासाठी एक परस्परसंवादी मार्ग देतात. Zuplay हे एक व्यापक गेमिंग प्लॅटफॉर्म आहे, जे क्रीडा उत्साही आणि कॅसिनो प्रेमी दोघांनाही सेवा देते. ते कॅज्युअल चाहत्यांसाठी आणि अनुभवी कसिनो लव्हर्ससाठी डिझाइन केलेले स्पोर्ट्सबुक प्रदान करते, ज्यामध्ये आयपीएलसह १०,००० हून अधिक क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. Zuplay त्याच्या वापरकर्त्यांसाठी एक रोमांचक आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते.

Web Title: Most Centuries in IPL Players With the Highest Number of Centuries Virat Kohli to Shubman Gill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.