क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक कोणते? या प्रश्नाचं उत्तर अनेक जण युवराज सिंगनं इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात मारलेल्या सहा षटकार असे देतील. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील त्या सामन्यात युवीनं सहा चेंडूंत सहा षटकार खेचून ३६ धावा चोपल्या. पण, एका गोलंदाजानं चक्क एका षटकात ७७ धावा दिलेल्या. होय हे खरं आहे. ते षटक पूर्ण करण्यासाठी गोलंदाजाला तब्बल २२ चेंडू फेकावी लागली होती. अम्पायरनं टोपी घेण्यास नकार दिला अन् शाहिद आफ्रिदीनं थेट ICCकडे केली तक्रार; जाणून घ्या विचित्र प्रकार
२५ फेब्रुवारी १९९०साली हा लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला होता. न्यूझीलंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये कँटेरबरी ( Canterbury) आणि वेलिंग्टन ( Wellington ) यांच्यात प्रथम श्रेणी क्रिकेटचा सामना ख्राईस्टचर्च येथे खेळवण्यात आला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी वेलिंग्टनला विजय मिळवणे अनिवार्य होतं. मोसमातील त्यांचा तो अखेरचा सामना होता आणि जेतेपद कायम राखण्यासाठी त्यांना विजयच हवा होता. अखेरच्या दिवशी वेलिंग्टन संघानं डाव घोषित केला आणि कँटेरबरीसमोर विजयासाठी ५९ षटकांत २९१ धावांचे लक्ष्य ठेवले. कँटेरबरीचे ८ फलंदाज १०८ धावांवर माघारी परतले होते आणि त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित मानला जात होता. ली जर्मोन आणि रॉजर फोर्ड यांनी सामना ड्रॉ करण्यासाठी प्रयत्न केले. चर्चा तर होणारच; नरेंद्र मोदी स्टेडियमवर एका बाजूला रिलायन्स एंड, तर दुसऱ्या बाजूला अदानी एंड!
दिवसाचा खेळ संपायला दोन षटकं शिल्लक राहिली होती आणि वेलिंग्टनच्या कर्णधारानं बर्ट व्हँसला गोलंदाजीसाठी बोलावलं. कँटेरबरीचे उर्वरित दोन फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर बाद होतील, असा त्यानं अंदाज बांधला. बर्ट यांनी नो बॉल टाकून षटकाची सुरूवात केली. त्यानं सुरुवातीला टाकलेल्या १७ चेंडूमध्ये एक चेंडू योग्य होता. त्यावर कोणतीच धाव झाली नाही. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार लागला. हे षटक पूर्ण झाले तेव्हा २२ चेंडू फेकली गेली आणि ७७ धावा निघाल्या. त्यानंतर कँटेरबरी संघाला अखेरच्या षटकात फक्त १८ धावांची गरज होती आणि त्यांनी १७ धावा बनवून सामना ड्रॉ राखला.