कोलकाता : आयपीएलसाठी गुरुवारी येथे होणाऱ्या लिलावादरम्यान आॅस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे काही युवा खेळाडू देखील ‘मोठ्या रकमांचे धनी’ होऊ शकतील.
आयपीएलच्या यंदाच्या १३ वे सत्राचे वैशिष्टय असे की याच सत्रात टी२० विश्वचषकाचे आयोजनही होणार आहे.लिलावात असलेल्या खेळाडूंच्या पूलमध्ये १४ वर्षे ३५० दिवस असे वय असलेला अफगाणिस्तानचा नूर अहमद सर्वात युवा खेळाडू असेल. डावखुरा ‘चायनामॅन’ असलेल्या या खेळाडूची मूळ किंमत ३० लाख आहे. राशिद खान आणि मोहम्मद नबी यांच्यासोबतीने तोही चढाओढीत असेल. नूरने भारताविरुद्ध १९ वर्षांखालील मालिकेत चमकदार कामगिरी केली होती.
भारतीय युवा खेळाडूंमध्ये मुंबईचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैयस्वाल, भारतीय १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार प्रियम गर्ग, तामिळनाडूचा डावखुरा फिरकीपटू साई किशोर आणि बंगालचा वेगवान गोलंदाज ईशान पोरेल या सर्वांची मूळ किंमत २० लाख आहे.लिलावाआधी आरसीबीने २२ वर्षीय विंडीजचा बिगहिटर शिमरॉन हेटमायर याला रिलिज केले. त्याची मूळ किंमत ५० लाख आहे. आठ फ्रेंचाइजी ७३ स्थानांसाठी बोली लावतील. हेटमायरला मागच्यावर्षी आरसीबीने ४.२ कोटीत खरेदी केले होते.त्याने पाच सामन्यात केवळ ९० धावा केल्याने आरसीबीने त्याला रिलिजही केले.
विंडीजचाच केसरिक विलियम्स याची मूळ किंमत ५० लाख आहे. त्याच्या वैविध्यपूर्ण चेंडूपुढे विराट कोहलीही वारंवार अडखळला होता. अनेक फ्रेंचाइजींकडे मर्यादित रकम असल्याने मोठी किंमत असलेल्या खेळाडूंवर अधिक बोली लागण्याची शक्यता आहे.लिलावादरम्यान पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, ख्रिस लिन, मिशेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल हे पाच आॅस्ट्रेलियन खेळाडू तसेच द. आफ्रिकेचे डेल स्टेन आणि श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज यांची मूळ किंमत दोन कोटी इतकी आहे. विश्वचषक खेळणाºया आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी लिलावापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मिशेल स्टार्कचा प्रामुख्याने समावेश आहे.भारतीयांमध्ये रॉबिन उथप्पा याची मूळ किंमत दीड कोटी आहे. पीयूष चावला आणि युसूफ पठाण यांची किंमत एक कोटी तर चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांची ५० लाख अशी किंमत आहे. (वृत्तसंस्था)फ्रेंचाइजी आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेली रक्कमचेन्नई सुपरकिंग्ज : १४.६० कोटीदिल्ली कॅपिटल्स : २७. ८५ कोटीकिंग्ज इलेव्हन पंजाब : ४२.७० कोटीकोलकाता नाइटरायडर्स : ३५.६५ कोटीमुंबई इंडियन्स : १३.०५ कोटीराजस्थान रॉयल्स : २८.९० कोटीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : २७.९० कोटीसनरायजर्स हैदराबाद : १७ कोटी