Most Marketable Athlete 2021: हार्दिक पांड्याची २०२१त मार्केट व्हॅल्यू वाढली; लिओनेल मेस्सी, रॉजर फेडरर यांच्यासह विराटवरही पडला भारी

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यानं दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि टेनिस सम्राट रॉजर फेडरर यांना मागे टाकत २०२१मध्ये सर्वाधिक मार्केटेबल अ‍ॅथलिट्समध्ये आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 04:24 PM2021-08-24T16:24:05+5:302021-08-24T16:24:36+5:30

whatsapp join usJoin us
Most Marketable Athlete 2021: No Virat Kohli as Hardik Pandya pips Lionel Messi, Roger Federer; Virat Kohli absent from top-50  | Most Marketable Athlete 2021: हार्दिक पांड्याची २०२१त मार्केट व्हॅल्यू वाढली; लिओनेल मेस्सी, रॉजर फेडरर यांच्यासह विराटवरही पडला भारी

Most Marketable Athlete 2021: हार्दिक पांड्याची २०२१त मार्केट व्हॅल्यू वाढली; लिओनेल मेस्सी, रॉजर फेडरर यांच्यासह विराटवरही पडला भारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यानं दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि टेनिस सम्राट रॉजर फेडरर यांना मागे टाकत २०२१मध्ये सर्वाधिक मार्केटेबल अ‍ॅथलिट्समध्ये आघाडी घेतली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या लिस्टमध्ये टॉप ५०तही नाही. २०२१मध्ये सर्वाधिक मार्केटेबल अ‍ॅथलिट्समध्ये हार्दिक ११व्या क्रमांकावर आहे आणि सलामीवीर शिखर धवन ४७व्या क्रमांकावर आला आहे. 

अमेरिकेची जिमनॅस्टपटू सिमोन बिल्स ही SportsPro’s 50 Most Marketable Athletes मध्ये अव्वल स्थानावर आहे. Greenfly and powered by Zoomph यांनी ही यादी जाहीर केली आहे. १९ वर्षीय सिमोन वर्ल्ड चॅम्पियन आहे आणि शिवाय तिच्या नावावर चार ऑलिम्पिक पदकं आहेत. तिनं टेनिस स्टार नाओमी ओसाका आणि गोलरक्षक अॅश्ली हॅरीस यांना मागे टाकले.  


हार्दिक पांड्या सध्या त्याच्या तंदुरुस्तीवर काम करत आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन हार्दिक आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यावरील वन डे व ट्वेंटी-२० मालिकेत हार्दिकनं दोन विकेट्स घेतल्या.  
 

Web Title: Most Marketable Athlete 2021: No Virat Kohli as Hardik Pandya pips Lionel Messi, Roger Federer; Virat Kohli absent from top-50 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.