भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यानं दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि टेनिस सम्राट रॉजर फेडरर यांना मागे टाकत २०२१मध्ये सर्वाधिक मार्केटेबल अॅथलिट्समध्ये आघाडी घेतली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या लिस्टमध्ये टॉप ५०तही नाही. २०२१मध्ये सर्वाधिक मार्केटेबल अॅथलिट्समध्ये हार्दिक ११व्या क्रमांकावर आहे आणि सलामीवीर शिखर धवन ४७व्या क्रमांकावर आला आहे.
अमेरिकेची जिमनॅस्टपटू सिमोन बिल्स ही SportsPro’s 50 Most Marketable Athletes मध्ये अव्वल स्थानावर आहे. Greenfly and powered by Zoomph यांनी ही यादी जाहीर केली आहे. १९ वर्षीय सिमोन वर्ल्ड चॅम्पियन आहे आणि शिवाय तिच्या नावावर चार ऑलिम्पिक पदकं आहेत. तिनं टेनिस स्टार नाओमी ओसाका आणि गोलरक्षक अॅश्ली हॅरीस यांना मागे टाकले.