नवी दिल्ली : राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने तयार केलेल्या क्रिकेटपटूंच्या अहवालात मागच्या सत्रात(२०१९-२०)अनेक खेळाडू खांदे आणि गुडघ्याच्या दुखापतींनी त्रस्त असल्याचे आढळून आले आहे.
एनसीए व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू करण्याच्या विचारात असून ४८ पानांच्या अहवालानुसार एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या काळात २६२ (२१८ पुरुष, ४४ महिला) क्रिकेटपटूंनी पुनर्वसन कार्यक्रमात भाग घेतला. त्यात खांद्याची दुखापत झालेल्यांची संख्या ३८, गुडघ्याची जखम झालेल्यांची संख्या ३४ होती. पाठोपाठ घोटा, जांघेचे दुखणे आणि पाठीच्या मणक्याचे दुखणे असलेल्यांची संख्या होती. खेळाडूंना दुखापतमुक्त ठेवण्यासाठी एनसीए शिक्षण सत्रावर भर देत आहे. याच कारणास्तव द्रविड यांनी मागच्या काही महिन्यात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासोबत बैठकांचेदेखील आयोजन केले होते. (वृत्तसंस्था)
Web Title: Most players suffered from shoulder and knee problems in 2019 20 says NCA Injury Surveillance Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.