Join us

MS Dhoni and wife Sakshi wedding anniversary: NOT OUT 15!! MS धोनी अन् पत्नी साक्षीने साजरा केला लग्नाचा १५वा वाढदिवस, (Video)

MS Dhoni and wife Sakshi wedding anniversary: महेंद्रसिंग धोनीने २०१० साली साक्षीशी प्रेमविवाह केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 12:00 IST

Open in App

MS Dhoni and Sakshi celebrating wedding anniversary: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांनी आज ४ जुलै रोजी त्यांच्या लग्नाचा १५वा वाढदिवस साजरा केला. धोनी दाम्पत्याने केक कापून त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. महेंद्रसिंह धोनी २००७ मध्ये कोलकाता येथील ताज हॉटेलमध्ये साक्षीला पहिल्यांदा भेटला होता. तिथे भारतीय संघ थांबला होता आणि त्यावेळी साक्षी त्याच हॉटेलमध्ये हॉटेल मॅनेजमेंटसाठी इंटर्नशिप करत होती. त्यानंतर दोघांनी २००८ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. दोन वर्षे डेट केल्यानंतर ४ जुलै २०१० रोजी धोनी आणि साक्षीने डेहराडूनमध्ये लग्न केले. आज त्यांच्या सहजीवनाला १५ वर्षे पूर्ण झाली.

साक्षी आणि धोनीची जोडी चाहत्यांना खूप आवडते. साक्षी आणि धोनी एकमेकांचे बालपणीचे मित्र आहेत. या जोडप्याची रंजक प्रेमकथा साऱ्यांनाच माहिती आहे. त्यांच्या लग्नाला आज १५ वर्षे पूर्ण झाली. धोनी दाम्पत्याला झिव्हा नावाची एक लेक देखील आहे. IPL मध्ये अनेकदा झिव्हा आपल्या बाबाला चिअर करण्यासाठी येत असते. तसेच, धोनी आणि साक्षी देखील अनेकदा IPLच्या मैदानावर जाहीरपणे आपले प्रेम व्यक्त करत असतात.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीलग्नभारतीय क्रिकेट संघ