Join us  

MS Dhoni: धोनीला मेंटॉर बनवून बीसीसीआयने केली मोठी चूक, झाली तक्रार, पाहा नेमका काय आहे प्रकार?

MS Dhoni News: भारतीय संघाच्या मेंटॉरपदाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने उचललेल्या पावलाचे कौतुक होत आहे. मात्र आता या प्रकरणात एक नवे वळण आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 5:35 PM

Open in App

मुंबई - पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाच्या मेंटॉरपदाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने उचललेल्या पावलाचे कौतुक होत आहे. मात्र आता या प्रकरणात एक नवे वळण आले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या वरिष्ठ परिषदेला महेंद्रसिंग धोनीच्या नियुक्तीविरोधात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेस्टची तक्रार मिळाली आहे. मध्य प्रदेश असोसिएशनचे माजी अधिकारी संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयला यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी धोनीची नियुक्ती हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेस्ट म्हणजेच हितसंबंधांचा मुद्दा आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही, असे सांगितले. (BCCI made a big mistake by making Dhoni a mentor, there was a complaint, see what is the Issue?)

महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघाचा कर्णधार आहे. तसेच आता बीसीसीआयने त्याला भारतीय संघासोबत मेंटॉर म्हणून नियुक्त केले आहे. यापूर्वी राहुल द्रविडने भारत अ संघाचा कर्णधार बनण्यापूर्वी आयपीएलशी असलेले आपले नाते तोडले होते. बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, हो संजीव गुप्ता यांनी बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी बीसीसीआयच्या घटनेच्या कलम ३९ (४) चा हवाला देऊन सांगितले की, याअंतर्गत एक व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही.

बीसीसीआयच्या उच्च कमिटीला आता आपल्या कायदेशीर टीमकडून याबाबत सल्ला घ्यावा लागेल. महेंद्रसिंग धोनी सध्या एका टीममध्ये खेळाडू म्हणून खेळत आहे. तर दुसरीकडे तो भारतीय संघासोबत मेंटॉर म्हणून राहणार आहे. त्यामुळे यावरून प्रश्न उपस्थित होणार होता. आता बीसीसीआयच्या घोषणेनंतर असे झाले आहे.

१७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. मात्र भारतीय संघासोबत मेंटॉर म्हणून महेंद्रसिंग धोनीच्या नावाची झालेली घोषणा चर्चेचा विषय ठरली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ चा क्रिकेट विश्वचषक आणि २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते.  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App