MS Dhoni Breaks Silence On IPL Retirement : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात CSK च्या ताफ्यातून खेळणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या IPL मधील निवृत्तीसंदर्भात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. चॅपॉकच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात धोनीची पत्नी साक्षी आणि लेक जीवासह त्याचे आई वडील मॅच पाहण्यासाठी आले अन् धोनीच्या निवृत्तीसंदर्भातील चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले. आता महेंद्रसिंह धोनीने यावर खुलासा केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यंदाच्या हंगामात खेळणारच, एवढेच नाही तर...
एका बाजूला IPL मधील निवृत्तीची चर्चा रंगत असताना महेंद्रसिंह धोनी लोकप्रिय पॉडकास्टर राज शमनी याला खास मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये धोनीनं आयपीएल २०२५ स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील सर्व सामन्यात खेळणार असल्याचे स्पष्ट केले. यंदाच्या आयपीएल हंगामानंतर मी ४४ वर्षांचा होईन. त्यानंतर पुढच्या हंगामात खेळायचं की नाही, ते ठरवण्यासाठी माझ्याकडे १० महिने असतील, असे म्हणत त्याने पुढच्या हंगामातही खेळण्याचा पर्याय खुला असल्याचे सांगितले.
CSK vs DC : धोनीचा शेवटचा सामना? जाणून घ्या सोशल मीडियावर का रंगलीये ही चर्चा
नेमकं काय म्हणाला धोनी?
पॉडकास्टमध्ये एमएस धोनी म्हणाला की, मी सध्या आयपीएलमध्ये खेळतोय. या स्पर्धेत खेळण्याबाबत माझा प्लान अगदी सिंपल आहे. मी एका वर्षात फक्त एका हंगामासंदर्भात विचार करतो. मी वर्षांचा आहे. आयपीएल २०२५ संपेल त्यावळी मी ४४ वर्षांचा होईन. त्यानंतर पुढच्या हंगामात खेळायचं की, नाही यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे १० महिन्यांचा वेळ असेल. निवृत्तीचा निर्णय हा माझ्यावर नाही तर माझे शरीर मला कसे साथ देईल, यावर अवलंबून असेल, हे देखील त्याने बोलून दाखवले.
वयाच्या ४३ व्या वर्षीही विकेटमागची जादू कायम
महेंद्रसिंह धोनी २००८ च्या पहिल्या हंगामापासून आयपीएलमध्ये खेळताना दिसतोय. आतापर्यंत २६८ सामन्यात त्याच्या नावे ५३१९ धावा आहेत. चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही धोनीने आपल्या नावे केला आहे. वयाच्या ४३ व्या वर्षीही धोनी विकेटमागे जी चपळाई दाखवून देत आहे ते कमालीचे आहे. यष्टीमागची त्याची कामगिरी लाजवाच आहे. १५३ झेल आणि ४५ स्टंपिंगचा रेकॉर्ड त्याच्या नावे आहे.