Join us  

Dhoniने खरेदी केली पहिली इलेक्ट्रिक कार, केदार जाधव आणि ऋरुराज गायकवाडला मारली चक्कर

धोनीची ही नवीन कार अवघ्या 18 मिनीटात 80% चार्ज होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 9:14 PM

Open in App

Dhoni Kia Electric Car: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) ला गाड्यांची आवड आहे, हे सर्वांनाच माहित आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्या आहेत. आता त्याच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये Kia इलेक्ट्रिक कार आली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जातोय की, त्याने Kia ची EV6 कार खरेदी केली आहे.

विशेष म्हणजे, धोनी या नवीन कियाला चालवतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो ऋतुराज गायकवाड आणि केदार जाधवला आपल्या नवीन गाडीत चक्कर मारताना दिसतोय. Kiaने या नवीन गाडीला एअरोडायनामिकमध्ये डिझाइन केले आहे. याच्या पुढील बाजुला ड्युअल एलइडी हेडलँप आहेत. तसेच, याचे डोअर हँडल्स आत लपून राहतात. 

इंटेरिअरला 19 इंच क्रिस्टल कट अलॉय व्हील्ज आहेत. तसेच, मागील बाजुस कनेक्टेड एलईडी टेल लँप मिळतात, जे गाडीला क्लीन आणि फ्यूचरिस्टिक लूक देतात. आतील बाजुस मनोरंजनासाठी 12 इंच कर्व्ड टच स्क्रीन सिस्टीम दिला आहे, जो नेव्हिगेशन सपोर्ट करतो. ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीटणध्ये रिलॅक्सेशन फीचरदेखील आहे. 

भारतात या इलेक्ट्रिक कारची किंमत 59.95 लाख रुपयांपासून 64.95 लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरूम) आहे. यात 77.4 kWh ची बॅटरी बसवण्यात आली आहे. ही गाडी एक चार्जवर तब्बल 708 किलोमीटरचे मायलेज देते. याची खास बाब म्हणजे, ही गाडी फक्त 18 मिनीटात 10 टक्क्यांवरुन 80 टक्के चार्ज होते. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीकिया मोटर्सइलेक्ट्रिक कारऑफ द फिल्डवाहन
Open in App