MS Dhoni, Traitor word, IPL 2025 CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्जचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड हाताच्या कोपराला दुखापत झाल्यामुळे 'आयपीएल' मधून बाहेर पडला. त्याच्या जागी अनुभवी महेंद्रसिंग धोनी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल, अशी घोषणा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी गुरुवारी केली. गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यादरम्यान जोफ्रा आर्चरचा आखूड टप्प्याचा चेंडू लागल्याने गायकवाडला दुखापत झाली होती. त्यामुळे पाचवेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिलेला भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनी पुन्हा CSKचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण तशातच धोनीचा एक व्हिडीओ चर्चेत आहे, ज्यात तो एका खेळाडूला गद्दार म्हणतोय. विशेष बाब म्हणजे ११ हंगामात तो खेळाडू CSKसाठी खूप महत्त्वाचा असूनही धोनी त्याला असं म्हणतोय. नेमका प्रकार काय, जाणून घेऊया.
आपल्या एका जुन्या सहकाऱ्याला भेटल्यावर धोनी त्याला गद्दार म्हणाला. ११ वर्षे CSK साठी घाम गाळलेल्या आणि कठोर परिश्रम घेतलेल्या या खेळाडूचे नाव आहे ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo). धोनी जेव्हा त्याला भेटला तेव्हा तो म्हणाला- 'हा बघा, गद्दार आला.' महत्त्वाची बाब म्हणजे धोनी हे सगळं विनोदी पद्धतीने मजा मस्करी करत बोलत होता. या दोघांमध्ये धमाल सुरू असताना हा विनोदी संवाद झाला. पाहा व्हिडीओ-
IPL मध्ये सीएसकेचा पुढचा सामना केकेआर विरुद्ध आहे. या सामन्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघ चेन्नईला पोहोचला. २०२५ च्या आयपीएलमध्ये ड्वेन ब्राव्हो केकेआरचा मार्गदर्शक आहे. यामुळेच धोनीने ब्राव्होला चिडवले आणि मजेदार पद्धतीने त्याचे स्वागत केले.
CSK - ब्राव्होचं ११ वर्षांचं कनेक्शन
ड्वेन ब्राव्होने २०११ मध्ये चेन्नईसाठी खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून तो आयपीएल २०२२ पर्यंत खेळला. या ११ वर्षांत तो चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून उदयास आला. ब्राव्होने ११ वर्षांत CSK साठी खेळलेल्या १३० टी२० सामन्यांच्या १२७ डावांमध्ये एकूण १५४ विकेट्स घेतल्या.