Join us

'कूssल' धोनी प्रिया प्रकाशसारखी भुवई उडवतो तेव्हा...

'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीनं प्रिया प्रकाश वारियरसारखी भुवई उडवून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 18:42 IST

Open in App

मुंबईः आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध ३४ चेंडूत ७० धावांची झंझावाती खेळी करून क्रिकेटप्रेमींना खुश करून टाकणाऱ्या 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीनं प्रिया प्रकाश वारियरसारखी भुवई उडवून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यानं ही पोझ नेमकी कधी, कुठे आणि कशासाठी दिलीय, हे कळू शकलेलं नाही.

'व्हॅलेंटाइन डे'मुळे प्रेमवीरांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेब्रुवारीत देशभरातील तरुणाईला प्रिया प्रकाश या तरुणीनं वेड लावलं होतं. भुवया उडवत ती आली आणि रातोरात स्टार झाली. काही सेकंदांच्या एका व्हिडीओनं प्रियाला 'नॅशनल क्रश' केलं होतं. त्यानंतर तिच्या इतरही अदांनी तरुणांना घायाळ केलंय - करत आहेत. सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या अतिप्रचंड आहे. 

दुसरीकडे, प्रिया प्रकाश महेंद्रसिंह धोनीची 'जबरा फॅन' आहे. तिनंच एका मुलाखतीत हे गुपित उघड केलं होतं. त्या पाठोपाठ आता धोनीही प्रियाचा चाहता झाल्याचे संकेत मिळताहेत. धोनीची खास मैत्रीण आणि हेअर स्टायलिस्ट सपना भावनानी हिने ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात भुवई उडवणारा धोनी पाहायला मिळतो. हा फोटो जुना असल्याचं त्यातील धोनीच्या हेअर स्टाइलवरून लक्षात येतं. 

दरम्यान, प्रिया प्रकाश महेंद्रसिंह धोनीची 'जबरा फॅन' आहे. तिनंच एका मुलाखतीत हे गुपित उघड केलं होतं.

दरम्यान, कालच माहीनं 'डॅडीज् ड्युटी'चा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात तो झिवाचे केस हेअर ड्रायरने वाळवताना दिसला. या बाबा धोनीचं सगळ्यांनीच भरभरून कौतुक केलं. 

 

टॅग्स :आयपीएल 2018महेंद्रसिंह धोनीप्रिया वारियर