पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam) याची सातत्यानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यासोबत तुलना केली जातेय... बाबर हा विराटपेक्षा सरस फलंदाज असल्याचा दावा पाकिस्तानचे आजी-माजी क्रिकेटपटू अन् फॅन्स अनेकदा करतात. पण, बाबरनं विराटसोबत स्पर्धा नाही, असे मान्य करताना भारतीय कर्णधाराचे कौतुक केले आहे. पण, याच बाबर आझमला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची कन्या जिवा हिनं धोबीपछाड दिली आहे.
पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं नुकतंच त्यांच्या सेंट्रल कराराची घोषणा केली अन् बाबर आझमला अ श्रेणीत स्थान दिले आहे. त्यानुसार त्याला वर्षाला १.२ कोटी पगार मिळणार आहे. तेच दुसरीकडे विराट कोहली बीसीसीआयकडून वर्षाला ७ कोटी इतका पगार घेतो. बाबरनं ३३ कसोटी, ८० वन डे व ५४ ट्वेंटी-२० सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे २१६९, ३८०८ व २०३५ धावा केल्या आहेत. विराट या लिस्टमध्ये बाबरच्या खूपच पुढे आहे.
धावांच्या व विक्रमाच्या बाबतीतच नव्हे तर सोशल मीडियावरही विराटच्या फॉलोअर्सच्या बाबतीतही विराटला तोड नाही. सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या क्रिकेटपटूचा मान विराटनं पटकावला आहे. विराट सोडा सोशल मीडियावर फॉलोअर्सच्या बाबतीत महेंद्रसिंग धोनीची मुलगी जिवा हिनंही बाबरला मागे टाकले आहे. इंस्टाग्रामवर बाबर आझमचे १० लाख ७२, ४८३ फॉलोअर्स आहेत, तर जिवाचे १९ लाख १४,४१९ फॉलोअर्स आहेत.