IPl 2023 Final: काल(दि.29) IPL 2023 चा अंतिम सामना पार पडला. यात महेंद्रसिंग धोनीचाचेन्नई सुपर किंग्स विजयी ठरला. पाऊस, राखीव दिवस आणि डकवर्थ लुईस नियम, या गोंधळात चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. चेन्नईने शेवटच्या षटकांमध्ये हा रोमांचक सामना जिंकला. चेन्नईच्या या दमदार विजयात रवींद्र जडेजा सर्वात मोठा हिरो ठरला. शेवटच्या दोन चेंडूत त्याने 10 धावा ठोकल्या. या सामन्यानंतरचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात चेन्नई सुपर किंग्सचादीपक चहर कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे ऑटोग्राफ मागत आहे. पण, धोनी त्याला ऑटोग्राफ देण्यास नकार देतो. पण, दीपकने हट्ट धरताच धोनी दीपकच्या टी-शर्टवर ऑटोग्राफ देतो. यादरम्यान धोनी आणि चहरसोबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लाही दिसत आहेत.
दीपक चहरला ऑटोग्राफ देताना धोनीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. धोनी राजीव शुक्ला यांना म्हणको, हा कॅच सोडतो...पण, नंतर दीपक ऑटोग्राफसाठी विनंती करतो आणि धोनी त्याला ऑटोग्राफ देतो. विशेष म्हणजे, यापूर्वी सुनील गावसकर यांनीदेखील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या लीग सामन्यादरम्यान धोनीकडून ऑटोग्राफ घेतला होता. तो क्षणही चांगलाच व्हायरल झाला.
धोनीने जडेजाला उचलले...
2023 च्या आयपीएल फायनलचा सर्वात मोठा हिरो होता रवींद्र जडेजा. चेन्नईने सामना जिंकताच त्याने डगआऊटकडे धाव घेतली. रवींद्र जडेजाने फाइन लेगवर मोहित शर्माच्या चेंडूवर चौकार मारताच तो थेट धोनीच्या दिशेने धावला. धोनीने जडेजाला कडेवर उचलले. आयपीएल 2023 मधील हा क्षण पाहून अनेक चाहत्यांचे डोळे पानावले.
चेन्नईने असा रचला इतिहास...
या सामन्यात चेन्नईला 215 धावांचे लक्ष्य मिळाले होते, मात्र पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार हे लक्ष्य 15 षटकांत 171 धावांचे झाले. प्रत्युत्तरात चेन्नई संघाने 5 विकेट्सवर 171 धावा करत सामना जिंकला. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने 25 चेंडूत सर्वाधिक 47 धावा केल्या. शिवम दुबेने 32 आणि अजिंक्य रहाणेने 27 धावा केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने 3 आणि नूर अहमदने 2 बळी घेतले.
Web Title: MS Dhoni-Deepak Chahar: As Deepak Chahar asks for his autograph, Dhoni refuses, what happens next? see
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.