Join us  

MS Dhoni: देवीच्या दर्शनाला भाविकांच्या गर्दीत दिसला माही, धोनीचा व्हिडिओ व्हायरल

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली काही दिवसांपूर्वी पत्नी अनुष्कासोबत ऋषिकेश दौऱ्यावर दिसला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 3:42 PM

Open in App

रांची - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याने एक फोटो शेअर केल्याने धोनी चर्चेत आला होता. शोले चित्रपटातील जय-वीरुच्या जोडीप्रमाणे तशाच गाडीवर हार्दीक पंड्या आणि महेंद्रसिंह धोनी बसल्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर, आता रांची येथील देवीच्या मंदिरात एमएस धोनी दर्शनासाठी गेला होता. धोनीचा या मदिरात दर्शन घेतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, भाविकांच्या गर्दीत धोनी माँ देवरा देवीचे दर्शन घेत आहे.

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली काही दिवसांपूर्वी पत्नी अनुष्कासोबत ऋषिकेश दौऱ्यावर दिसला होता. आता, महेंद्रसिंह धोनी हाही धार्मिक पर्यटन करत असल्याचे दिसून येते. झारखंडमधील प्रसिद्ध मंदिर असलेल्या माँ देवरी मंदिरात एम.एस. धोनी आला होता, या मंदिरात इतर भाविकांसमवेत गर्दी उभं राहून माहीने दर्शन घेतले. 

व्हायरल व्हिडीओत धोनी निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत असून गावाकडील त्याच्या जुन्या मित्रांसमवेत तो देवीच्या दर्शनाला आल्याचे समजते. दरम्यान, रांची येथे नुकत्याच झालेल्या भारत-न्यूझीलंड T20 सामन्यातही धोनी स्टेडियममध्ये दिसला होता. 

IPL 2023 च्या मौसमात दिसणार धोनी

एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता जवळपास 3 वर्षे उलटली आहेत. मात्र, धोनीचे चाहते आजही त्याला मैदानात मीस करतात. त्यामुळेच, आयपीएल सामन्यांची वाट पाहात आहेत. कारण, धोनीने आयपीएल खेळणं सुरूच ठेवले आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार म्हणून धोनी अजूनही मैदान गाजवतो. दरम्यान, आयपीएल 2023 मध्येही तो खेळण्याची पूर्ण शक्यता आहे. या मौसमातही चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद त्याच्याकडेच असणार आहे. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीझारखंडमंदिर
Open in App